Monday, 13 May 2013

नरेंद्र मोदींची युपीए सरकारवर टीका.
दि. १३ मे.

    गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात दिनाच्या समारंभानिमित्त अमेरिकेच्या २० शहरांमधील अनिवासी भारतीयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. युपीए सरकाराच्या परराष्ट्र धोरणावर बोलतना ते म्हणाले की अतिशय कमकुवत नेते देशात राज्य चालवीत आहेत अशी टीका त्यांनी केली.
   गेल्या १२ वर्षात  गुजरातचा विकास करताना  आपण विकासाचा व्याख्या बदलुन टाकली. लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या चिनी सैन्याने माघार घेतली, पण त्याचबरोबर भारतीय सैन्याने माघार का घेतली, असा प्रश्न मोदी यांनी विचारला. तसेच आपल्या सैनिकांचा शिरच्छेद केल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी या घटनेनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे शाही स्वागत केले. सध्या या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणे हेच भारतासमोरील मोठे आव्हान आहे. असे त्यांनी सांगितले.
   गुजरात मॉडेल ने राज्याचा विकास एका नव्या उंचावर नेला आहे. याची दखल इतिहास घेईल. असा दावाही त्यांनी केला.


                                                                                                                                         

Sunday, 12 May 2013

७५0 कोटींचे संपत्ती. 
दि. १२मे कोलकाता
   
    शारदा चिटफंड मुख्य सूत्रधार सुदिप्तो सेन व साथीदारांची संपत्ती उघड.

    चिटफंडच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडविणारा शारदा समूहाचा प्रमुख सुदिप्तो सेन आणि त्याच्या कंपनीतील वरिष्ठ साथीदारांची ७५0 कोटी रुपये किमतीची मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली आहे.
   कंपनीच्या अधिकार्‍यांनी रक्कम घेऊन जाण्यासाठी वापरलेल्या सहा मोटारसायकलीसुद्धा जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकलींना विशिष्ट संकेत देण्यासाठी लाल दिवा व हॉर्न लावलेले आढळून आले. शारदा समूहाच्या कार्यालयातील एका गॅरेजमध्ये ही वाहने आढळली, अशी माहिती पोलीसांनी दिली. विधाननगरचे पोलीस उपायुक्त अर्णव घोष यांनी अटकेत असलेल्या सेन याची आतापर्यंत सुमारे ७५0 कोटी रुपये किमतीची मालमत्ता शोधून काढण्यात यश आल्याचे सांगितले. या पश्‍चिम बंगालातील आजवरच्या सर्वांत मोठय़ा आर्थिक घोटाळ्याचा तपास घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 
   सेन आणि त्याचा खास साथीदार देबजानी मुखर्जी याची दक्षिण २४, परगणा जिल्ह्यातील जॉयनगर पोलिसांनी सखोल चौकशी केली. येथील काही गुंतवणूकदारांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रारी नोंदविलेल्या आहेत. विधाननगर पोलीस आयुक्तालयातील तपास अधिकारी शारदा समूहाच्या मालमत्तेबाबत सेन आणि मुखर्जीची कसून चौकशी करीत आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, लपविलेला पैसा व मालमत्ता हुडकून काढण्याचा आम्ही शर्तीने प्रयत्न करीत आहोत. यासोबतच रोख रकमांचे व्यवहार हाताळणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांना शोधण्याची गरज आहे. यात घोटाळ्यातील पैसा, संबंधित कागदपत्रे व दस्तऐवज हस्तगत करण्याचा आमचा हेतू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 
   तपासादरम्यान सेनच्या मालकीच्या सिमला येथील ४0 एकर जमिनीचा शोध लागला, असे सूत्रांनी स्पष्ट केले. शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले कंपनीचे अनेक एजंट आणि गुंतवणूकदारांनी आत्महत्या केल्याने जनतेमध्ये कमालीचा रोष आहे.
   सेनला अनावश्यक सवलती देणार्‍या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका माजी अधिकार्‍याची तपास पथकाने चौकशी केली. सेनच्या चौकशीत त्याला मदत करणारे भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी), आयकर विभाग, बँका तसेच केंद्रीय व राज्य सरकारमधील अनेक अधिकार्‍यांची नावे चव्हाट्यावर आली आहेत. त्यांच्यापैकी काहींची आधीच चौकशी करण्यात आली. त्यांची उत्तरे आणि सेनने दिलेली माहिती सुसंगत आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे.
   सुदिप्तो सेन याने ७.७ एकरात मोटारसायकलचा मोठा बनावट कारखाना आणि तेथे दीडशे कर्मचारी काम करीत असल्याचे भासवून हजारो गुंतवणूकदारांना विश्‍वास जिंकला. त्याने स्थापन केलेल्या शारदा समूहाने अल्पावधीतच हजारो गुंतवणूकदारांना मायाजालात ओढले. दुचाकी वाहनांच्या जोडणीचे काम सुरू आहे. सुटे भाग जोडले जात आहे हे दाखविताना हे कर्मचारी निळ्या गणवेशात दिसत असत.

Friday, 10 May 2013


लातूर जिल्ह्यात एसटीमध्ये स्फोट; 19 जखमी




१० मे नळेगाव (लातुर)


       लातुर जिल्यातील चाकुर  तालुक्यातील नळेगावात एसटी बसमध्ये शक्तीशाली स्फोट झाला.  उदगीरहून लातूरकडे निघालेल्या राज्य परिवहनच्या बसमध्ये आज सायंकाळी ७.१0 वाजता नळेगाव येथील बसस्थानकात झालेल्या स्फोटात १९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ९ जण गंभीर आहेत. बसस्फोटाच्या घटनास्थळी पोलिसांना काही जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची माहिती पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी दिली. 
   सर्व जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बसमध्ये नेमका स्फोट कशाचा झाला, याचा उलगडा झाला नसुन पोलीस तपास करत आहे.उदगीर आगाराची बस सायंकाळी ६ वाजता उदगीर बसस्थानकातून लातूरकडे रवाना झाली. ती लातूरपासून नळेगाव बसस्थानकात पोहोचली. प्रवाशंना उतरवून बस बंद करून चालक स्थानकात नोंद करण्यासाठी निघाला होता. तेव्हा बसमध्ये जोरदार स्फोट झाला. घटना घडली तेव्हा बसमध्ये जवळपास ५५ प्रवासी होते. 
   घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा काही जिलेटीनच्या कांड्याचे अवशेष पोलिसांना घटनास्थळी मिळाले आहेत. त्यामुळे जिलेटीनमुळे स्फोट झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तरी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.
पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण
   घटनास्थळी पोलिस उशिरा आल्याने पोलिसानां नागरिकांनच्या असंतोषाला सामोरे जायला लागले. काही कर्मचार्‍यांना यात मारहाण झाली. तसेच पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकारानंतर घटनास्थळी एटीएस, बॉम्बशोधक पथक व अधिकारी पोहोचले. त्यांनी नागरिकांना दूर करुन तपासकार्य सुरु केले होते. केबिन आणि मागचा भाग सुरक्षित असताना बसच्या मध्यभागात स्फोट झाल्याने वेगळाच संशयही व्यक्त होत आहे.
   घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा काही जिलेटीनच्या कांड्याचे अवशेष पोलिसांना घटनास्थळी मिळाले आहेत. त्यामुळे जिलेटीनमुळे स्फोट झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तरी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.


Tuesday, 7 May 2013

सरकारी उदासीनतेमुळे सात हजार टन गहू सडला.
७ मे (नवी दिल्ली)

   देशातील ३० टक्के जनता व ४७ टक्के मुले कुपोषित असताना अयोग्य साठवणुकीमुळे गेल्या साडेतीन वर्षात सरकारी गोदामांमध्ये तब्बल ७३४० टन गहु सडुन गेल्याची धक्कादायक माहिती भारतीय अन्न महामंडळाने दिली आहे.
   उत्तर प्रदेशचे कुश कारला यांनी माहिती अधिकार वापर करुन अन्न महामंडळाकडुन ही माहिती मिळवली. त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमध्ये वर्ष २००९-१० मध्ये २,०१० टन, वर्ष २०१०-११ मध्ये १९९७ टन व वर्ष २०११-१२ मध्ये २४०१ टन गहु सडला आहे. 
   अन्न महामंडळाकडुन मिळालेल्या माहितीनुसार बिहार मध्ये सर्वाधिक ३०६ टन गहु सडला. त्याखालोखाल उत्तराखंडमध्ये २२१ टन, गुजरात मध्ये १९५ टन तसेच गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजे १४४४ टन गहु महामंडळाच्या महाराष्ट्रातील गोदामांमध्ये सडला होता.
   शेतमालासाठी बाजारसुविधा उपलब्ध नसणे, गोदामांची सोय नसणे इत्यादी कारणामुळे धान्याची मोठ्याप्रमाणावर नासाडी होते. रेशन व्यवस्थेसाठी धान्य खरेदी व साठवणुकीची जबाबदारी असलेल्या भारतीय अन्न महामंडळाकडे गरजेहुन खुपच तुटपूंजी म्हणजे जेमतेम ३३.९९ दशलक्ष टन एवढीच धान्य साठवणुकीची क्षमता आहे.

Sunday, 5 May 2013

अखेर चिनची मागार....
५ मे (लेह, नवी दिल्ली)

   १५ एप्रिला चीनने भारताची प्रत्यक्ष नियत्रंण रेषा ओलांडून डीओबी सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत सुमारे १९ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण बनले होते. भारताने याबद्दल सतत आक्षेप नोंदवला होता. परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांचा ९ मे रोजी होणारा दौरा रद्द करण्याचा इशारा भारताने दिल्यानंतर चिनी लष्कराने माघार घेण्याचे ठरवले. या माघारीनंतर भारतानेही पुढे आणलेले सैन्य मागे घेतले आहे. 







    दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकारांच्या रविवारी सांयकाळी झालेल्या बैठकीत चीनने सैन्य मागे घेण्याचे  मान्य केले. उभय देशाच्या स्थानिक कमांडनी हस्तांदोलन करीत या वादावर पदडा पडल्याचे जाहिर केले.  या घडामोडींमुळे  खुर्शिद यांचा दौरा आणि चीनचे पंतप्रधान ली कछियांग यांचा २० मे रोजी होणारा भारत दौरावरील सावट दूर झाल्याचे मानण्यात येत आहे. 



Sunday, 28 April 2013

सरबजीतला ठार मारण्याच्या होता इरादा- हल्लेखोरांचा कबुली
२८ (लाहोर)

   कोट लखपत तुरुंगात असलेल्या सरबजीत सिंगवर प्राणघातक हल्ला करणार्या हल्लेखोरांना त्याला ठारच मारायचे होते, असे समोर आले आहे. लाहोर येथील झालेल्या बॉम्बस्फोटात सरबजीतचा हात असल्याने त्याला ठार मारण्याचा कट या आरोपींनी केला, असे पोलीस चौकशीतुन पुढे आले आहे. तसेच, या हल्लामागे तुरुंग अधिकारांचाही हात असल्याचा आरोप सरबजीतची बहीण दलबीर कौर यांनी केला आहे. 
   आरोपी आमेर आफताब व मुदस्सर हे दोघेही मृत्युदंडाची शिक्षा झालेले आरोपी आहेत. १९९० च्या बॉम्बस्फोटात पाक नागरिकांच्या मृत्युला ते सरबजीतला दोषी ठरवत होते. त्या तिरस्कारातुन त्यांनी हल्ला केला. पोलीस उपमहानिरीक्षक(तुरुंग) मलिक मुबाशीर यांनी चौकशीचा आपला प्राथमिक अहवाल पंजाब प्रांताच्या गृह मंत्रालयाला सादर केला. 

वाचण्याची शक्यता कमी.
   जीना रुग्णालयात भरती असलेल्या  सरबजीतच्या प्रकृतीत ४८ तास उलटुन गेले तरीही सुधारणा दिसुन येत नाही आहे. या हल्ल्यातुन तो वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याने उपचार करणारया डॉक्टरांनी सांगितले. सरबजीत सिंगला भारतात पाठवावे व तिथे त्याला अधिक चांगले उपचार मिळु शकतील, अशी मागणी सरबजीतची पत्नी सुखप्रीत कौर यांनी केली आहे.

Friday, 26 April 2013

सरकारच्या कडक भुमिकेमुळे डॉक्टरांचा संप मागे.

२६ एप्रिल (मुंबई)

   उच्च  न्यायालयाने  दिलेल्या  आदेशानुसार व  संप  केलेल्या  डॉक्टरांवरती  मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारने  घेतलेल्या  निर्णयामुळे  चार हजार निवासी  डॉक्टरांनी चौथ्या दिवशी संप मागे घेतला. त्यामुळे सरकारी व  पालिकेच्या  इस्पितळांमध्ये  वैद्दकीय  सेवा  पूर्ववत होईल. 
   सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न इस्पितळे व मुंबई पालिकेच्या तीन इस्पितळांतील निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी ८ पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. जे. जे. हॉस्पिटलसह काही ठिकाणी डॉक्टर आधीच रुजू झाले आहेत. जे. जे. हॉस्पिटलसह काही ठिकाणी डॉक्टर आधीच रुजू झाले आहेत. राज्यभरात इतर सरकारी इस्पितळांमधील संप मागे घेतला जात असतानाच मुंबईतील नायर, सायन व केईएम इस्पितळांमधील संप कायम होता. त्यानुसार राज्य सरकारने कडक भुमिका घेत रुजु न झालेल्या डॉक्टरांवरती मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारने काल रात्री काढला होता. त्यानुसार पोलीस कारवाई तातडीने सुरू केली जाणार होती. पण आज सायंकाळी निवासी डॉक्टरांही नमते घेत संप मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकारने जे काही दिले त्याबाबत समाधान झाल्याने डॉक्टरांनी संप मागे घेतला, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केला. 

आश्वासान
- निवासी डॉक्टरांना दरमहा ५००० हजारांची वेतनवा़ढ. 
- बाँडच्या एक वर्षाच्या काळात पहिल्या तीन महिन्यांत निवासी डॉक्टरांना राज्य सरकार नोकरी देऊ शकले नाही, तर त्यांना बाँडच्या बंधनातून मुक्त समजले जाईल. 
- ओबीसी विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती 
- निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी इस्पितळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू. 
- सुरक्षारक्षकांची संख्याही वाढविली जाणार.

Thursday, 25 April 2013

चीटपंड घोटाळा- चिदंबरम यांच्या पत्नीचा सहभाग.

२५ एप्रिल (नवी दिल्ली)

   लाखो गरिब, मध्यमवर्गीय लोकांची आयुष्यभराची जमापुंजीवर डल्ला मारुन प्रकाशझोत्यात आलेल्या पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुपच्या चीटपंड घोटाळ्यात केंद्रिय अर्थमंत्री यांच्या पत्नी वकील नलिनी यांचेही नाव पुढे आले आहे. घोटाळ्याचा मुख्य आरोपी शारदा ग्रुपचा अध्यक्ष सुदीप्तो सेनने सीबीआयला 18 पानांचे पत्र पाठवले आहे. त्यात नलिनी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, त्यात तृणमूल काँग्रेसचे कुणाल घोष आणि संजय बोस या खासदारांचीही नावे आहेत. नलिनी चिंदबरम या चेन्नईतील ज्येष्ठ कायदेतजज्ञ आहेत. विशेषत: आर्थिक बाबींविषयक खटले, कंपनी लॉ या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे काम केले. परंतु नलिनी यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले आहेत.

 चिट फंड कंपन्यांवर नजर
  या पार्श्वभुमीवर  उद्योग विभागाचे मंत्री सचिन पायलट यांनी शारदा ग्रुपसह अशा प्रकारचे आरोप असलेल्या सर्व चिट फंड कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने (एसएफआयओ) विशेष कार्यदल तयार करण्याचे निर्देश बजावले गेले आहेत. पश्चिम बंगालमधील 12 ग्रुपच्या 73 कंपन्यांविरुद्ध तक्रारी आहेत.

नलिनी यांच्यावरील आरोप
   नरसिंग राव सरकारमधील मंत्री मतंग सिंग, त्यांची पत्नी मनोरंजना आणि माझी कंपनी यांच्यात नलिनी चिदंबरम यांनी डील करण्यासाठी मध्यस्थी केली. सुदीप्तो सेनने त्यांना 1 कोटीहून अधिक रक्कम दिली
   आसाममध्ये एका टीव्ही वाहिनीला सुरुवात करण्यासाठी मदत करण्याची सूचना नलिनी यांनी सुदीप्तो सेनला केली होती. त्याचबरोबर कोणताही वाद झाला तर त्याचे निपटारा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

  

Wednesday, 24 April 2013

यशाचे शिखर


   तुमच्या मनात जी असेल, ती नक्की पूर्ण होईल, परंतु या इच्छापूर्तीसाठी एक अट आहे. त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही तुमचे तन, मन, धन खर्च केले पाहिजे. वास्तविक तुमच्याजवळ ज्या गोष्टी आज आहेत, त्यासुध्दा तुम्हाला हव्या आहेत, म्हणून त्या तुमच्याजवळ आहेत. तुमच्या मनात जर आशावाद असेल, यशाचे विचार असतील, सुखाचे व्यवहार असतील व त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर तुमच्या विचारानुसार तुम्हाला सर्व काही मिळेल.
   तुमचे प्रयत्न सफल व्हायचे असतील तर आपले शक्ती काय आहे, ते समजुन घ्या. तुम्ही स्वत: ला दबळे समजत असाल, तर तुम्ही दुबळे राहाल, म्हणून तुम्ही नेहमी मनात सुविचार बाळगा. कारण माणसाच्या मनातील विचाराप्रमाणे त्याची पूर्ती होत असते. तुमच्या मनात 'मी यश मिळवीनच' असे विचार असतील तर तुम्ही यश मिळवालच. अनेकदा माणुस अनेकदा माणुस अडचणीच्या वेढ्यात सापडलेला असतो. त्याला सतत अपयश येत असते. त्याला आशेचा किरण कोठेच दिसत नाही, अशी बिकट परिस्थिती ओढवली तरीही तुम्ही निराश होउ नका. मनातील आशावाद सोडू नका. प्रसिध्द विश्वविजेता चंगीझखान याची एक कथा आहे. त्याचा सर्व आघाड्यांवर पराभव झाला होता. शत्रु जवळ आला होता आणि चंगीझखानाने एका पडक्या घरात आश्रय घेतला होता. तेथे तो झोपला असताना त्याला एका कोपर्यात एक कोळी जाळे विणताना दिसला. तो कोळी आपल्या शरिरातून धागा काढायचा आणि वर चिकटवायचा. तो धागा तुटून जायचा. चंगीझखानाने मोजले तेव्हा त्याला दिसले की, त्या कोळ्याने तो तुटलेला धागा शंभर वेळा जोडण्याचा  प्रयत्न केला. चंगीझखानाच्या मनात विचार आला. हा लहानसा कोळी शंभर वेळा प्रयत्न करतो, आपला तर फक्त एकदाच पराभव झाला आहे. या लहानशा निरीक्षणामुळे चंगीझखानाला प्रेरणा मिळाली आणि नंतर त्याने जग जिंकले. 
   पण सामान्य माणुस मात्र एका प्रयत्नात यश मिळाले नाही, तर सर्व  प्रयत्न सोडून देतो व निराश होतो. तो म्हणतो, 'माझ्या भाग्यातच यश नाही', पण यश तुमच्या दारातच उभे असते, यश आणि अपयश यात दोन पावलांचे अंतर असते. शेवटची दोन पावले टाकली तर तुम्हाला यश मिळण्यासारखे असते, पण ही दोन पावलेच तो टाकत नाही.

   

Tuesday, 23 April 2013

'मनरेगा' त अनियमितता - कॅग

२४ एप्रिल

   युपीए सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनातील गैरव्यवहार कॅगने उघडकीस आणला आहे. अनेक राज्यांतील लोक योजनेपासुन वंचित असुन, जॉब कार्डामध्ये बोगस कामे आहेत. निधी वळविण्यासह आणि १९६०.४५ कोटी रुपयांची निकषबाह्य कामे करवुन घेण्यात आली. तसेच ४००० कोटी रुपयांची कामे अर्पुणावस्थेत असुन महाराष्ट्रात कामे  अपुर्ण राहण्याचे प्रमाण जास्त आहे, असा उल्लेखही अहवालात आहे.

                                             

धोरणात गोंधळ

१. ही योजना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने सन २००६ मध्ये सुरु करण्यात आली. 
२.१३ हजार कोटी रुपयांची खैरात वाटली गेली. योजनेचा फायदा गरजु आणि पात्र लोकांपर्यत पोहोचला नाही.
३.मंजुरीच नसलेल्या १ लाख २१०० कामांवर तब्बल २ हजार २५२.४३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. 
४.जेथे मनरेगाच्या कामांची अत्यंत गरज होती. तेथे ४०७० कोटी रुपयांची कामे ५ वर्षापासुन प्रलंबित आहेत.            
५.१४ राज्याच्या मनरेगाच्या सव्वा लाख जॉब कार्डसमध्ये फोटोच नाही, म्हणजेच ती बनावटच होती. 
६.२००९-१० वर्षात सरासरी ५४ दिवसकाम झाले. २०११-१२ मध्ये ते घटुन ४३ दिवस काम झाले. 

  मनरेगा घोटाळ्यावरुन मंगळवारी दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. 


Monday, 22 April 2013

बांगलादेशच्या अध्यक्षपदी अब्दुल हमीद.

   
                              


    बांगलादेशच्या अध्यक्षपदी बांगलादेश संसद अध्यक्ष अब्दुल हमीद यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बांगलादेशचे विसावे अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.
   राष्ट्रध्यक्ष जिलुर रेहमान यांच्या मृत्युनंतर हामीद काळजीवाहु राष्ट्रध्यक्ष काम पाहत होते. त्यानुसार हमीद यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी बांगलादेश आवामी लीगचे उमेदवार म्हणुन त्यांनी रविवारी अर्ज दाखल केला. हामीद १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र लढ्यात सहभागी झाले होते. १९८६, १९९१, २००१ आणि २००८ मध्ये ते संसदेवर निवडुन गेले होते.

Tuesday, 16 April 2013


अमेरिकेतील  बोस्टन  शहरात  स्फोट- ३ठार

बोस्टन- अमेरिकेतील बोस्टन शहरात स्थानिक वेळेनुसार दुपारी मॅरेथान दरम्यान झालेल्या दोन बॉम्बस्फोटात ३ ठार, तर शेकडो जखमी झाले आहे. हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
     भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास  दोन्ही स्फोट झाले. या साखळी
स्फोटांत अवघ्या १५ ते २० सेकंदांचे अंतर होते. फिनिशलाइनपासुन २५० मीटर अंतरावर पहिल्या
प्रेक्षक गॅलरीत हे स्फोट झाले. त्यानंतर थोड्या वेळेने जेएफके लायब्ररीत तिसरा स्फोट झाला.मॅडेरीन हॉटलमध्ये एक जिवंत बॉम्बही पोलिसांच्या हाती लागला. तो निकामी करण्यात आला आहे.
     या स्फोटानंतर राष्ट्राला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की या 
स्फोटाबद्दल दोषी असलेल्यांना शोधण्यात येईल. स्फोटामागे दहशतवाद्दांचा हात असल्याचे अद्दाप
निश्चित नसुन याचा शोध घेण्यात येत आहे, अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन  बोस्टन
वासियांना सहकार्य केले पाहिजे.

Thursday, 21 February 2013

आप्पा  पेंडसे  स्मृती व्याख्यान                                                                                                              

व्याख्याते-   माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार )
                   श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त)
                   विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई )

       आप्पा  पेंडसे  यांच्या स्मृती दिनानिमित्त  मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईतील वाहतूक समस्या  या विषयावर व्याख्यान  आयोजित केले होते. या कार्यक्रमात माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार ), श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त) तसेच विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई ) यांनी आपापली मत मांडली.मुंबई मध्ये  वाहतूक समस्या   हि दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तसेच दररोज वाढणाऱ्या नवीन वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची  समस्या हि गंभीर बनत चालली आहे. रिक्षा  चालकांची मुजोरी, भाडी नाकारणे अशा कारणामुळे  लोकांमध्ये असंतोष हा वढतो. असे मत माधवराव शिरवाळकरांनी  व्यक्त केले. तसेच त्यांनी या संबधीत वेबसाईट यांचा उल्लेख केला.  
       श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक  समस्या यावर मत व्यक्त केले कि मुंबईतील वाहतूक व्यवस्था हि स्वस्त व चांगली व्यवस्था आहे बेस्ट बस व्यवस्था चे उदाहरण दिले. बेस्ट हि बस व्यवस्था   हि भारतातील चांगली व प्रभावी वाहतूक  व्यवस्था  आहे. यासंबधीत त्यांनी एक आठवण सांगितली कि ९२ च्या दंगलीनंतर रस्त्यावर सामसूम होते. लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी  रस्त्यावर रिकाम्या बसेस फिरवण्याचे आदेश दिले कि ज्यामुळे लोकांमधील  भीतीचे वातावरण कमी होईल. ८५% मुंबईकर बस, रेल्वेने प्रवास करतात. 
       या  समस्या  निर्माण का झाल्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले कि गेल्या १० ते २० वर्षात वाहने वाढली पण रस्ते व्यवस्था तशीच राहिली.  तसेच त्यांनी हकीम अहवाल चा उल्लेख केला. वाहतूक समस्ये मुळे  नवीन येणाऱ्या वाहनां च्या नोंदणी वरती बंदी घालू शकत नाही. हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील ५०% रस्त्यांचा वापर हा पार्किंगसाठी होतो व मुंबई ऑक्ट्रोय रेट  हा जास्त असल्यामुळे वाहनांची नोंद हि ठाणे, नवी मुंबई, भिवंडी ला होते. 

श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक   समस्येवर सांगितले उपाय. 
१) पार्किंग रेट  वाढवणे.
२) नागरिकाला तो राहण्याच्या विभागात नोकरी दिल्यास त्याचा प्रवास कमी होईल. तसेच घरासंबंधी stamp      व registration fee  कमी केली पाहिजे. 
३) कार्यालयीन कामात इंटरनेट वापर केला तर काही काम घरी करण्यास मदत होईल.  
        
 
वाहतूक समस्या  म्हणजे वाहतूक पोलिस असे समीकरण बनल्याची खंत वाहतूक पोलिस उपायुक्त विवेक फळसणकर
यांनी व्यक्त केले.  वाहतूक  समस्या बरोबर वाहतूक पोलिसांना सामोऱ्या जाण्यारया अडचणी सुद्धा लोकांनी लक्षात घ्यावे असे आवाहन  फळसणकरांनी केले. तसेच ट्राफिक हवालदाराबरोबर १ तास काम करून बघा व ते रोज कुठल्या अडचणींना सामोरे जातात हे कळेल. लोकांची मानसिकता भावनाशुन्य होत चालली आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केले.  यावर उपाय म्हणुन उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. तसेच लोकांच्या मानसिकता बदल घडायला हवा. अशी त्यांनी इच्छा व्यक्त  केली.  






Thursday, 17 January 2013


मुंबई महिलांसाठी किती सुरक्षित?

         देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारामुळे महिलांचा सुरक्षेचा मुद्दा हा चर्चेत आला. अत्याचाराविरोधात देशात विविध ठिकाणी निर्दशने झाली. उगवत्या पिढीने या चळवळीत भाग घेतला. अत्याचाराविरोधात रस्तावर आली. लोकशाहित अन्यायाविरोधात आवाज उठवला जात आहे, हि जाणीव व संवेदनशीलता महत्वाची आहे.
        दिल्लीतील महिला किती सुरक्षित आहेत, याविषयी चर्चा आतापर्यंत अनेकदा झाल्या. त्याचवेळी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या आणि चोरी, दंगली अशा प्रश्नाने घेरले्ल्या मुंबईत महिलांची सुरक्षा हा प्रश्न ही आपोआपच येतो. मुंबईत महिला १००टक्के सुरक्षित आहे असे अजिबात नाही. मात्र दिल्लीसारख्या शहराची तुलना करता मुंबई महिलांसाठी अजुनपर्यंत किमान सुरक्षित आहे असेच दिसते. आजही रात्री उशिरापर्यंत येथील नोकरदार तसेच गृहिणी फिरु शकतात.त्यांना धोका नाही असे नाही, पण दिल्लीसारख्या भयंकर भीतीच्या सावटाखाली मुंबईतील महिला नाहित हेही खरेच.
                                       
        दिल्लीतील नोकरदार ज्यांच्या कुटुंबातील मुली शिक्षण वा नोकरी-व्यवसायनिमित्ताने मुंबईकर झाल्या आहेत, अशा महिलांना महिला अत्याचारांबाबत मुंबईची अद्दापि दिल्ली झालेली नाही असे वाटते.
        अनुजा शर्मा, विद्यार्थिनी ही मुळची दिल्लीची पण मुंबईत स्थायिक झाली. तसेच  मुळच्या मुंबईच्या असलेल्या जयश्री पाटील या गृहिणी आहेत यांचे अनुभव लक्षात घेण्याजोग आहे. 
  
        रस्तावरुन चालणारया महिलेला गाडीत टाकायचे. निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करुन कुठल्याशा रस्त्यावर आ़डवाटेवर फेकुन द्दायचं या घटना दिल्लीकरांना नविन नाहीत म्हणुनच कदाचित त्या तरुणी व तिच्या मित्राच्या मदतीला जावं असे दिल्लीकरांना त्या रात्री वाटले नाही. पण हीच घटना जर मुंबईत झाली असती तर त्या मुलीच्या उघ़ड्या जखमी शरीराला झाकण्यासाठी हजारो हात मध्यरात्रीच्या वेळीही पुढे आले असते. म्हणुन आम्हाला मुंबई अधिक जवळची व सुरक्षित वाटते. कारण अजुन तरी मुंबईच्या संवेदना बोथट झालेल्या नाहीत.
                                                                                            ...अनुजा शर्मा (विद्यार्थिनी)

       महाराष्ट्रायीय संस्क्रृतीमुळे आज महाराष्टात थोड्याप्रमाणात का होईना पण संवेदना जागृत आहे. अजुन ही आम्ही खरेदीसाठी एकट्या बाहेर पडतो. काही प्रमाणात महिलांना आदर दिला जातो. मुंबईत आम्हाला गर्दीची भीती नाही तर आधार वाटतो.
                                                                                                ....जयश्री पाटिल (मालाड)

       प्रख्यात गायक रब्बी शेरगील यांनी आपली वेगळे मत मांडली आहेत.  शेरगील म्हणतात की, भारताच्या उत्तर भागात महिलांवर प्रेम करण्याची संस्क्रृती नाही. महाराष्ट्र आणि इतर भागात प्रेमची संस्क्रृती आहे. उत्तरेत ती नाही याची कारणं ही ऐतिहासिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवर आहेत. महिला ही उपभोगाची वस्तु आहे हाच विचार इथे दृढमुल झालेला आहे. ज्यावेळी परकीयांची आक्रमणं होत होती त्यावेळेस महिलांना आधी लुटलं जायचं. या सगळ्याचा परिणाम इथल्या सामाजिक मानसिकतेवर झालेला असल्याचं शेरगील सांगतात. 
       मला वैयक्तिक रित्या वाटते कि मुंबईत अजुनतरी महिला किमान सुरक्षित आहेत. आजुबाजुच्या संशयी वातावरणाचा दडपण महिलांवरती येते. पण घाबरुन जाऊन  महिला घरी बसत नाही आहेत. ही बाब महत्वाची आहे.
      समाजातील जाणीव व सुसंस्कृतपणाचा भाग सोडला तर मुळ अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या व्यवस्थेतील उणीवा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. महिलांनी रात्री-अपरात्री बाहेर पडु नये, घर सांभाळावे असे उपदेश देणारे ही लोक समाजात वावरत आहे. त्यातच चित्रपटात दाखविली जाणारी अश्लिलता,  स्वस्तात उपलब्ध असणारे अश्लिल साहित्य याचा देखील काही प्रमाणात परिणाम समाजावर पडत आहे.

       यावर उपाय म्हणुन सरकारने आपल्या व्यवस्थेत बदल करायला हवा. 

१) शिक्षण व्यवस्थेत  आमुलाग्र बदल करायला हवा. ज्या वयात मुलांना लैंगिक प्रश्न पडतात. त्या वयात पालकांनी व शिक्षकांनी समुपदेशन करायची आवश्यकता आहे. त्यांना वाढत्या वयात होणारया शारिरिक बदलाची माहिती देणे गरजेचे आहे. 

२) अत्याचारग्रस्त महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन पोलीस व न्याययंत्रणेने बदलला पाहिजे. 

३) अत्याचार गुन्हांची चौकशी करण्यासाठी वेगळी पोलीसयंत्रणा हवी. अशा यंत्रणाना पुरेशे प्रशिक्षण देण्यात यावे. 

४) बलात्काराची व्याख्या बदलुन अजुन त्याची व्याप्ती वाढवायला हवी, अत्याचारग्रस्त महिलेला संरक्षण मिळाले पाहिजे.

     शेवटी हा पुरुषी अहंकाराचा, दृष्टीकोनाचा प्रश्न आहे. पुरुषांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. अन्यायाविरोधात लढण्याची गरज आहे.  उद्या आपल्या तसेच कोणाच्या ही आई-बहिणीवर अशा प्रसंग न येवो यासाठी आपण एकजुठीने या समस्येविरोधात उभे राहणे गरजेचे आहे.




Monday, 7 January 2013


फेसबुक'वर दिसल्यास ठरणार भ्रष्टाचाराचा गुन्हा 

कौलालंपूर (मलेशिया)- "फेसबुक'वर ऑनलाइन होण्याचे व्यसन कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. मलेशियातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये "फेसबुक' फीवर अगदी टोकाला गेला आहे, त्यामुळे कामाच्या वेळेत "फेसबुक'वर ऑनलाइन राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मलेशियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने घेतला आहे. 
     कामाच्या वेळेत "फेसबुक'वर वैयक्तिक चर्चा करताना कर्मचारी सापडल्यास संबंधित गुन्हेगारावर शिस्तभंगाची कारवाई होईल. संबंधित शिस्तमंडळ कर्मचाऱ्यावरील कारवाईचे स्वरूप ठरवेल. "एमएसीसी"च्या कायद्याअंतर्गत याचा समावेश झाला नसला तरी शिस्तमंडळाचा सूचना देण्याचा अधिकार "एमएसीसी'ला असल्याचे सुतीनाह यांनी स्पष्ट केले. 
     सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत फेसबुकवर असल्याची गंभीर दखल मलेशिया सरकारने घेतली आहे. मलेशियन अँन्टी करप्शन कमिशन (एमएसीसी)ने याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासंदर्भात एमएसीसी'चे मुख्य आयुक्त दकुत सुतीनाह सुतान म्हणाल्या, "सरकारी कर्मचारी ऑफिसमधील वेळेत सुमारे तीन तास फेसबुकवर वैयक्तिक गप्पा मारण्यात वेळ घालवतात, असे निदर्शनास आले आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील पूर्णवेळ कामसाठी दिला पाहिजे.'' 

Sunday, 30 December 2012


भारतीय नागरिकाचा खून वर्णद्वेषातून
वृत्तसंस्था
      न्यूयॉर्क - सब-वे स्टेशनवर उभ्या असलेल्या सुनंदो सेन या भारतीय वंशाच्या नागरिकाला रेल्वेखाली ढकलून दिल्याप्रकरणी एका 31 वर्षीय अमेरिकन स्त्रीला पोलिसांनी अटक केली आहे. वर्णद्वेषातून खून केल्याचा गुन्हा या महिलेच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींचा आपण द्वेष करीत असून, त्या द्वेषातूनच सेन यांना रेल्वेखाली ढकलले असल्याचे अटक करण्यात आलेल्या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
      इरिका मेनेंडेझ असे या महिलेचे नाव असून, ती क्वीन्स येथील रहिवासी आहे. वर्णद्वेषातून सुनंदो सेन या 46 वर्षीय भारतीयाच्या खुनाला जबाबदार ठरल्याचा गुन्हा इरिकाच्या विरोधात दाखल झाला आहे. या महिलेला क्वीन्स येथील न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, या प्रकरणी ती दोषी ठरल्यास 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद अमेरिकेतील कायद्यात आहे.
      क्वीन्स येथे राहणाऱ्या सेन यांनी कोलंबिया विद्यापीठाजवळ एक दुकान सुरू केले होते. सेन अविवाहित होते. तसेच, त्यांच्या माता-पित्याचे निधन झालेले आहे. सेन यांच्या मृत्यूबद्दल भारतातील त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इरिका हिने 27 डिसेंबर रोजी क्वीन्स रेल्वेस्थानकावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या सेन यांना स्टेशनात प्रवेश करणाऱ्या गाडीखाली ढकलले होते. रेल्वेखाली चिरडून सेन यांचा मृत्यू झाला होता. सब-वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पळून जाणाऱ्या इरिकाची छायाचित्रे टिपली होती. घटनेनंतर दोन दिवसांनी एका नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी इरिकाला ताब्यात घेतले.

Wednesday, 26 December 2012


लादेननेही दिली होती लाच.......
इस्लामाबाद 
   
      भ्रष्टाचाराची समस्या ही विश्‍वरुपी झालेली आहे. संपूर्ण जगात दहशत पसरविणारा अल कईदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनदेखील यातून सुटू शकला नसल्याची बाब त्यानेच लिहीलेल्या रोजनिशीतून उघड झाली आहे. पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घर बांधण्यासाठी तलाठय़ाला (पटवारी) चक्क ५0 हजार रुपयांची लाच द्यावी लागल्याचे त्याने डायरीत नमूद केले आहे.
अबोटाबाद येथे गतवर्षी २ मे रोजी अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडोंनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. अबोटाबाद येथेच पाकिस्तानी लष्कराची प्रशिक्षण अकादमीही आहे. त्या शहरात पाकच्या आजी-माजी सुरक्षा अधिकार्‍यांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे. अशा ठिकाणी ओसामा अखेरच्या काळात गुप्तपणे वास्तव्य करून होता. तेथे त्याने १४ फूट उंचीची संरक्षक भिंत असलेली ३ मजली हवेली बांधली होती. ही हवेली बांधण्यास त्याला स्थानिक तलाठय़ाला चक्क ५0 हजार रुपयांची लाच द्यावी लागली होती.
      पाकिस्तान सरकारने ती हवेली आता पाडली आहे. तेथे सापडलेल्या १ लाख ३७ हजार कागदपत्रांमध्ये रोजनिशीही सापडली. त्यातील एका नोंदीनुसार ओसामाने लाच दिली होती, असे उघड झाले आहे.
लादेनचे पाकमधील वास्तव्य व त्याच्याविरुद्ध अमेरिकेने केलेली कारवाई यासंबंधी न्यायालयीन चौकशी आयोगाने तेथील सरकारी यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे.
त्यात या मुद्याचाही समावेश असल्याचे जंग या वर्तमानपत्राने म्हटले आहे. हा अहवाल पाक सरकारपुढे अद्याप मांडला गेलेला नाही आणि तो उघड करावा की नाही, याबाबत अधिकार्‍यांत दुमत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
      ओसामाला पाकिस्तानी महसूल खात्याच्या अधिकार्‍यांची लाचखोरी ठाऊक होती. परंतु वास्तव्याबाबत गुप्तता पाळण्यासाठी ओसामाही नाईलाजास्तव तलाठय़ाला लाच द्यावी लागल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने त्या तलाठय़ाला अटक केली आहे. पण ज्याच्याकडून लाच घेतली तो लादेन असल्याचे आपल्याला माहित नव्हते, असे त्याने स्पष्ट केले आहे.

Monday, 24 December 2012


चीनवर झाला असता अमेरिकेचा हल्ला.....
वॉशिंग्टन 
(वृत्तसंस्था)
         १९६२ मध्ये चीनने भारताचा पराभव केल्यानंतर अमेरिका चीनवर अत्यंत संतप्त झाली होती व चीनने पुन्हा असे कृत्य केल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करण्याचा अमेरिकेचा विचार होता. कम्युनिस्ट चीनकडून भारताचा पराभव होऊ नये, असे अमेरिकेला वाटत होते. 
         अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ९ मे १९६३ रोजी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. चीनकडून भारताचा पराभव होता कामा नये, चीनला चांगलाच धडा शिकवण्याची गरज असून, गरज पडल्यास चीनवर अण्वस्त्रांचा मारा करावा, असा निर्णय दिला होता. आपण इस्रायल व सौदी अरेबियाला मदत करतो, त्याचबरोबर आपल्याला भारताला हमी दिली पाहिजे आणि गरज पडली तर तिचे पालन केले पाहिजे. चीनला भारताचा पराभव करू देता कामा नये, त्यासाठी आपण भारताला मदत केली पाहिजे, असे केनेडी यांनी म्हटले होते. आपण दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममधून बाहेर पडू आणि भारताला मदत करू. चीनने परत भारताची कुरापत काढली तर त्यावेळी आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे केनेडी यांनी या बैठकीत सांगितले होते. व्हाईट हाऊसमधील या बैठकीत तत्कालीन संरक्षण मंत्री रॉबर्ट मॅकन्मारा, सुरक्षा दल प्रमुख जनरल मॅक्सवेल डेवनपोर्ट, मॅक्स टेलर उपस्थित होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. जुलै १९६२ मध्ये केनेडी यांनी ओव्हल ऑफिसमध्ये छुपी रेकॉर्डिंग यंत्रणा बसविली होती. ओव्हल ऑफिसमध्ये होणार्‍या बैठकीतील संवांदाचे व निर्णयांचे अचूक रेकॉर्डिंग व्हावे यासाठी ही सोय करण्यात आली होती.
       ‘लिसनिंग इन : द सिक्रेट व्हाईट हाऊस रेकॉर्डिंग्ज ऑफ जॉन एफ केनेडी’ या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. टेड विडमर आणि कॅरोलिन केनेडी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यात केनेडींची भाषणे व व्हाईट हाऊसमधील बैठकीतील संवादांचे संकलन आहे.

Friday, 21 December 2012


                                          ५० वर्षांत मानवाचे क्लोनिंग शक्य

लंडन 
       नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा विश्वास
     
        येत्या ५० वर्षांत मानवाचा क्लोन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश येईल, असा विश्वास यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले शास्त्रज्ञ सर जॉन गर्डन यांनी व्यक्त केला आहे. १९९६मध्ये क्लोनिंग तंत्रज्ञानाने डॉली या मेंढीची यशस्वीरित्या निर्मिती करणाऱ्या एडिंबरोमधील शास्त्रज्ञांच्या यशामध्ये सर जॉन गर्डन यांनी पन्नास आणि साठच्या दशकात बेडकांच्या क्लेनिंगवर केलेल्या प्रयोगांचे मोठे योगदान होते. संपूर्ण मानवाचे क्लोनिंग करण्याआधी नैतिकतेच्या अनेक मुद्द्यांना तोंड द्यावे लागणार असले, तरी हे तंत्रज्ञान वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व चिंता दूर होतील, असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे.
      या संशोधनामुळे अपघातात मूल गमावलेल्या पालकांना आपल्या मुलासारखे मूल मिळू शकेल. मात्र क्लोनिंगद्वारे निर्मिती केलेल्या बहुसंख्य प्राण्यांमध्ये नंतर दोष निर्माण झाले आहेत.  ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मानवाचे क्लोनिंग करण्याआधी या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे गर्डन यांनी म्हटले आहे.

Thursday, 20 December 2012


लंडन 
      अमेरिकेसारख्या महासत्तेला "विकीलिक्‍स'च्या माध्यमातून हादरे दिल्यानंतर आता "पुढील वर्षी जगातील प्रत्येक देशाची गोपनीय कागदपत्रे जाहीर करू' असा इशारा "विकीलिक्‍स'चे संस्थापक ज्युलियन असांजे यांनी दिला आहे. जवळपास सर्व देशांना फटका बसेल, अशी एक लाखांहून अधिक गोपनीय कागदपत्रे "विकीलिक्‍स'कडे असल्याचे असांजे यांनी इक्‍वेडोरच्या दूतावासातून केलेल्या भाषणात सांगितले.

      असांजे यांच्यावर स्वीडनमध्ये बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी गेले सहा महिने असांजे यांनी इक्‍वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला आहे. याच दूतावासाच्या गच्चीतून असांजे यांनी भाषण केले. ते म्हणाले, ""यंदाचे वर्ष सीरियाविषयीची गोपनीय कागदपत्रे खुली करण्याबरोबरच इतर घडामोडींमुळे धावपळीचे होते. पुढील वर्षीही आपण सगळे असेच व्यस्त असू. एक लाखांहून अधिक गोपनीय कागदपत्रे खुली करण्याची तयारी "विकीलिक्‍स'मध्ये सुरू आहे. याचा फटका जगातील प्रत्येक देशाला बसेल.''

      राजकीय आश्रय देणाऱ्या इक्‍वेडोरचे आभार मानत असांजे यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. ""खरी लोकशाही "व्हाइट हाउस'मध्ये नाहीच. ताहिरीरपासून लंडनपर्यंत सत्यासाठी लढा देणारी सामान्य जनता म्हणजेच खरी लोकशाही आहे,'' असे असांजे म्हणाले. असांजे यांनी याआधी 19 ऑगस्ट रोजी समर्थकांशी जाहीर संवाद साधला होता.