मुंबई महिलांसाठी किती सुरक्षित?
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारामुळे महिलांचा सुरक्षेचा मुद्दा हा चर्चेत आला. अत्याचाराविरोधात देशात विविध ठिकाणी निर्दशने झाली. उगवत्या पिढीने या चळवळीत भाग घेतला. अत्याचाराविरोधात रस्तावर आली. लोकशाहित अन्यायाविरोधात आवाज उठवला जात आहे, हि जाणीव व संवेदनशीलता महत्वाची आहे.
दिल्लीतील महिला किती सुरक्षित आहेत, याविषयी चर्चा आतापर्यंत अनेकदा झाल्या. त्याचवेळी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या आणि चोरी, दंगली अशा प्रश्नाने घेरले्ल्या मुंबईत महिलांची सुरक्षा हा प्रश्न ही आपोआपच येतो. मुंबईत महिला १००टक्के सुरक्षित आहे असे अजिबात नाही. मात्र दिल्लीसारख्या शहराची तुलना करता मुंबई महिलांसाठी अजुनपर्यंत किमान सुरक्षित आहे असेच दिसते. आजही रात्री उशिरापर्यंत येथील नोकरदार तसेच गृहिणी फिरु शकतात.त्यांना धोका नाही असे नाही, पण दिल्लीसारख्या भयंकर भीतीच्या सावटाखाली मुंबईतील महिला नाहित हेही खरेच.
दिल्लीतील नोकरदार ज्यांच्या कुटुंबातील मुली शिक्षण वा नोकरी-व्यवसायनिमित्ताने मुंबईकर झाल्या आहेत, अशा महिलांना महिला अत्याचारांबाबत मुंबईची अद्दापि दिल्ली झालेली नाही असे वाटते.
अनुजा शर्मा, विद्यार्थिनी ही मुळची दिल्लीची पण मुंबईत स्थायिक झाली. तसेच मुळच्या मुंबईच्या असलेल्या जयश्री पाटील या गृहिणी आहेत यांचे अनुभव लक्षात घेण्याजोग आहे.
रस्तावरुन चालणारया महिलेला गाडीत टाकायचे. निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करुन कुठल्याशा रस्त्यावर आ़डवाटेवर फेकुन द्दायचं या घटना दिल्लीकरांना नविन नाहीत म्हणुनच कदाचित त्या तरुणी व तिच्या मित्राच्या मदतीला जावं असे दिल्लीकरांना त्या रात्री वाटले नाही. पण हीच घटना जर मुंबईत झाली असती तर त्या मुलीच्या उघ़ड्या जखमी शरीराला झाकण्यासाठी हजारो हात मध्यरात्रीच्या वेळीही पुढे आले असते. म्हणुन आम्हाला मुंबई अधिक जवळची व सुरक्षित वाटते. कारण अजुन तरी मुंबईच्या संवेदना बोथट झालेल्या नाहीत.
...अनुजा शर्मा (विद्यार्थिनी)
महाराष्ट्रायीय संस्क्रृतीमुळे आज महाराष्टात थोड्याप्रमाणात का होईना पण संवेदना जागृत आहे. अजुन ही आम्ही खरेदीसाठी एकट्या बाहेर पडतो. काही प्रमाणात महिलांना आदर दिला जातो. मुंबईत आम्हाला गर्दीची भीती नाही तर आधार वाटतो.
....जयश्री पाटिल (मालाड)
प्रख्यात गायक रब्बी शेरगील यांनी आपली वेगळे मत मांडली आहेत. शेरगील म्हणतात की, भारताच्या उत्तर भागात महिलांवर प्रेम करण्याची संस्क्रृती नाही. महाराष्ट्र आणि इतर भागात प्रेमची संस्क्रृती आहे. उत्तरेत ती नाही याची कारणं ही ऐतिहासिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवर आहेत. महिला ही उपभोगाची वस्तु आहे हाच विचार इथे दृढमुल झालेला आहे. ज्यावेळी परकीयांची आक्रमणं होत होती त्यावेळेस महिलांना आधी लुटलं जायचं. या सगळ्याचा परिणाम इथल्या सामाजिक मानसिकतेवर झालेला असल्याचं शेरगील सांगतात.
मला वैयक्तिक रित्या वाटते कि मुंबईत अजुनतरी महिला किमान सुरक्षित आहेत. आजुबाजुच्या संशयी वातावरणाचा दडपण महिलांवरती येते. पण घाबरुन जाऊन महिला घरी बसत नाही आहेत. ही बाब महत्वाची आहे.
समाजातील जाणीव व सुसंस्कृतपणाचा भाग सोडला तर मुळ अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या व्यवस्थेतील उणीवा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. महिलांनी रात्री-अपरात्री बाहेर पडु नये, घर सांभाळावे असे उपदेश देणारे ही लोक समाजात वावरत आहे. त्यातच चित्रपटात दाखविली जाणारी अश्लिलता, स्वस्तात उपलब्ध असणारे अश्लिल साहित्य याचा देखील काही प्रमाणात परिणाम समाजावर पडत आहे.
यावर उपाय म्हणुन सरकारने आपल्या व्यवस्थेत बदल करायला हवा.
१) शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करायला हवा. ज्या वयात मुलांना लैंगिक प्रश्न पडतात. त्या वयात पालकांनी व शिक्षकांनी समुपदेशन करायची आवश्यकता आहे. त्यांना वाढत्या वयात होणारया शारिरिक बदलाची माहिती देणे गरजेचे आहे.
२) अत्याचारग्रस्त महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन पोलीस व न्याययंत्रणेने बदलला पाहिजे.
३) अत्याचार गुन्हांची चौकशी करण्यासाठी वेगळी पोलीसयंत्रणा हवी. अशा यंत्रणाना पुरेशे प्रशिक्षण देण्यात यावे.
४) बलात्काराची व्याख्या बदलुन अजुन त्याची व्याप्ती वाढवायला हवी, अत्याचारग्रस्त महिलेला संरक्षण मिळाले पाहिजे.
शेवटी हा पुरुषी अहंकाराचा, दृष्टीकोनाचा प्रश्न आहे. पुरुषांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. अन्यायाविरोधात लढण्याची गरज आहे. उद्या आपल्या तसेच कोणाच्या ही आई-बहिणीवर अशा प्रसंग न येवो यासाठी आपण एकजुठीने या समस्येविरोधात उभे राहणे गरजेचे आहे.
.jpg)