नरेंद्र मोदींची युपीए सरकारवर टीका.
दि. १३ मे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात दिनाच्या समारंभानिमित्त अमेरिकेच्या २० शहरांमधील अनिवासी भारतीयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
युपीए सरकाराच्या परराष्ट्र धोरणावर बोलतना ते म्हणाले की अतिशय कमकुवत नेते देशात राज्य चालवीत आहेत अशी टीका त्यांनी केली.
गेल्या १२ वर्षात गुजरातचा विकास करताना आपण विकासाचा व्याख्या बदलुन टाकली. लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या चिनी सैन्याने माघार घेतली, पण त्याचबरोबर भारतीय सैन्याने माघार का घेतली, असा प्रश्न मोदी यांनी विचारला. तसेच आपल्या सैनिकांचा शिरच्छेद केल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी या घटनेनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे शाही स्वागत केले. सध्या या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणे हेच भारतासमोरील मोठे आव्हान आहे. असे त्यांनी सांगितले.
गुजरात मॉडेल ने राज्याचा विकास एका नव्या उंचावर नेला आहे. याची दखल इतिहास घेईल. असा दावाही त्यांनी केला.
My passion
Monday, 13 May 2013
Sunday, 12 May 2013
७५0 कोटींचे संपत्ती.
दि. १२मे कोलकाता
शारदा चिटफंड मुख्य सूत्रधार सुदिप्तो सेन व साथीदारांची संपत्ती उघड.
चिटफंडच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडविणारा शारदा समूहाचा प्रमुख सुदिप्तो सेन आणि त्याच्या कंपनीतील वरिष्ठ साथीदारांची ७५0 कोटी रुपये किमतीची मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली आहे.
कंपनीच्या अधिकार्यांनी रक्कम घेऊन जाण्यासाठी वापरलेल्या सहा मोटारसायकलीसुद्धा जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकलींना विशिष्ट संकेत देण्यासाठी लाल दिवा व हॉर्न लावलेले आढळून आले. शारदा समूहाच्या कार्यालयातील एका गॅरेजमध्ये ही वाहने आढळली, अशी माहिती पोलीसांनी दिली. विधाननगरचे पोलीस उपायुक्त अर्णव घोष यांनी अटकेत असलेल्या सेन याची आतापर्यंत सुमारे ७५0 कोटी रुपये किमतीची मालमत्ता शोधून काढण्यात यश आल्याचे सांगितले. या पश्चिम बंगालातील आजवरच्या सर्वांत मोठय़ा आर्थिक घोटाळ्याचा तपास घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सेन आणि त्याचा खास साथीदार देबजानी मुखर्जी याची दक्षिण २४, परगणा जिल्ह्यातील जॉयनगर पोलिसांनी सखोल चौकशी केली. येथील काही गुंतवणूकदारांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रारी नोंदविलेल्या आहेत. विधाननगर पोलीस आयुक्तालयातील तपास अधिकारी शारदा समूहाच्या मालमत्तेबाबत सेन आणि मुखर्जीची कसून चौकशी करीत आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, लपविलेला पैसा व मालमत्ता हुडकून काढण्याचा आम्ही शर्तीने प्रयत्न करीत आहोत. यासोबतच रोख रकमांचे व्यवहार हाताळणार्या कंपनीच्या कर्मचार्यांना शोधण्याची गरज आहे. यात घोटाळ्यातील पैसा, संबंधित कागदपत्रे व दस्तऐवज हस्तगत करण्याचा आमचा हेतू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तपासादरम्यान सेनच्या मालकीच्या सिमला येथील ४0 एकर जमिनीचा शोध लागला, असे सूत्रांनी स्पष्ट केले. शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले कंपनीचे अनेक एजंट आणि गुंतवणूकदारांनी आत्महत्या केल्याने जनतेमध्ये कमालीचा रोष आहे.
सेनला अनावश्यक सवलती देणार्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका माजी अधिकार्याची तपास पथकाने चौकशी केली. सेनच्या चौकशीत त्याला मदत करणारे भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी), आयकर विभाग, बँका तसेच केंद्रीय व राज्य सरकारमधील अनेक अधिकार्यांची नावे चव्हाट्यावर आली आहेत. त्यांच्यापैकी काहींची आधीच चौकशी करण्यात आली. त्यांची उत्तरे आणि सेनने दिलेली माहिती सुसंगत आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे.
सुदिप्तो सेन याने ७.७ एकरात मोटारसायकलचा मोठा बनावट कारखाना आणि तेथे दीडशे कर्मचारी काम करीत असल्याचे भासवून हजारो गुंतवणूकदारांना विश्वास जिंकला. त्याने स्थापन केलेल्या शारदा समूहाने अल्पावधीतच हजारो गुंतवणूकदारांना मायाजालात ओढले. दुचाकी वाहनांच्या जोडणीचे काम सुरू आहे. सुटे भाग जोडले जात आहे हे दाखविताना हे कर्मचारी निळ्या गणवेशात दिसत असत.

Friday, 10 May 2013
लातूर जिल्ह्यात एसटीमध्ये स्फोट; 19 जखमी
१० मे नळेगाव (लातुर)
लातुर जिल्यातील चाकुर तालुक्यातील नळेगावात एसटी बसमध्ये शक्तीशाली स्फोट झाला. उदगीरहून लातूरकडे निघालेल्या राज्य परिवहनच्या बसमध्ये आज सायंकाळी ७.१0 वाजता नळेगाव येथील बसस्थानकात झालेल्या स्फोटात १९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ९ जण गंभीर आहेत. बसस्फोटाच्या घटनास्थळी पोलिसांना काही जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची माहिती पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी दिली.
सर्व जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बसमध्ये नेमका स्फोट कशाचा झाला, याचा उलगडा झाला नसुन पोलीस तपास करत आहे.उदगीर आगाराची बस सायंकाळी ६ वाजता उदगीर बसस्थानकातून लातूरकडे रवाना झाली. ती लातूरपासून नळेगाव बसस्थानकात पोहोचली. प्रवाशंना उतरवून बस बंद करून चालक स्थानकात नोंद करण्यासाठी निघाला होता. तेव्हा बसमध्ये जोरदार स्फोट झाला. घटना घडली तेव्हा बसमध्ये जवळपास ५५ प्रवासी होते.
घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा काही जिलेटीनच्या कांड्याचे अवशेष पोलिसांना घटनास्थळी मिळाले आहेत. त्यामुळे जिलेटीनमुळे स्फोट झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तरी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.
पोलीस कर्मचार्यांना मारहाण
घटनास्थळी पोलिस उशिरा आल्याने पोलिसानां नागरिकांनच्या असंतोषाला सामोरे जायला लागले. काही कर्मचार्यांना यात मारहाण झाली. तसेच पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकारानंतर घटनास्थळी एटीएस, बॉम्बशोधक पथक व अधिकारी पोहोचले. त्यांनी नागरिकांना दूर करुन तपासकार्य सुरु केले होते. केबिन आणि मागचा भाग सुरक्षित असताना बसच्या मध्यभागात स्फोट झाल्याने वेगळाच संशयही व्यक्त होत आहे.
घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा काही जिलेटीनच्या कांड्याचे अवशेष पोलिसांना घटनास्थळी मिळाले आहेत. त्यामुळे जिलेटीनमुळे स्फोट झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तरी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.
Tuesday, 7 May 2013
सरकारी उदासीनतेमुळे सात हजार टन गहू सडला.
७ मे
(नवी दिल्ली)
देशातील ३० टक्के जनता व ४७ टक्के मुले कुपोषित असताना अयोग्य साठवणुकीमुळे गेल्या साडेतीन वर्षात सरकारी गोदामांमध्ये तब्बल ७३४० टन गहु सडुन गेल्याची धक्कादायक माहिती भारतीय अन्न महामंडळाने
दिली आहे.
उत्तर प्रदेशचे कुश कारला यांनी माहिती अधिकार वापर करुन अन्न महामंडळाकडुन ही माहिती मिळवली.
त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमध्ये वर्ष २००९-१० मध्ये २,०१० टन, वर्ष २०१०-११ मध्ये १९९७ टन व वर्ष २०११-१२ मध्ये २४०१ टन गहु सडला आहे.
अन्न महामंडळाकडुन मिळालेल्या माहितीनुसार बिहार मध्ये सर्वाधिक ३०६ टन गहु सडला. त्याखालोखाल उत्तराखंडमध्ये २२१ टन, गुजरात मध्ये १९५ टन तसेच गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजे १४४४ टन गहु महामंडळाच्या महाराष्ट्रातील गोदामांमध्ये सडला होता.
शेतमालासाठी बाजारसुविधा उपलब्ध नसणे, गोदामांची सोय नसणे इत्यादी कारणामुळे धान्याची मोठ्याप्रमाणावर नासाडी होते. रेशन व्यवस्थेसाठी धान्य खरेदी व साठवणुकीची जबाबदारी असलेल्या भारतीय अन्न महामंडळाकडे गरजेहुन खुपच तुटपूंजी म्हणजे जेमतेम ३३.९९ दशलक्ष टन एवढीच धान्य साठवणुकीची क्षमता आहे.
Sunday, 5 May 2013
अखेर चिनची मागार....
५ मे (लेह, नवी दिल्ली)
५ मे (लेह, नवी दिल्ली)
१५ एप्रिला चीनने भारताची प्रत्यक्ष नियत्रंण रेषा ओलांडून डीओबी सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत सुमारे १९ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण बनले होते. भारताने याबद्दल सतत आक्षेप नोंदवला होता. परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांचा ९ मे रोजी होणारा दौरा रद्द करण्याचा इशारा भारताने दिल्यानंतर चिनी लष्कराने माघार घेण्याचे ठरवले. या माघारीनंतर भारतानेही पुढे आणलेले सैन्य मागे घेतले आहे.
दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकारांच्या रविवारी सांयकाळी झालेल्या बैठकीत चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. उभय देशाच्या स्थानिक कमांडनी हस्तांदोलन करीत या वादावर पदडा पडल्याचे जाहिर केले. या घडामोडींमुळे खुर्शिद यांचा दौरा आणि चीनचे पंतप्रधान ली कछियांग यांचा २० मे रोजी होणारा भारत दौरावरील सावट दूर झाल्याचे मानण्यात येत आहे.
Sunday, 28 April 2013
सरबजीतला ठार मारण्याच्या होता इरादा- हल्लेखोरांचा कबुली
२८ (लाहोर)
२८ (लाहोर)
कोट लखपत तुरुंगात असलेल्या सरबजीत सिंगवर प्राणघातक हल्ला करणार्या हल्लेखोरांना त्याला ठारच मारायचे होते, असे समोर आले आहे. लाहोर येथील झालेल्या बॉम्बस्फोटात सरबजीतचा हात असल्याने त्याला ठार मारण्याचा कट या आरोपींनी केला, असे पोलीस चौकशीतुन पुढे आले आहे. तसेच, या हल्लामागे तुरुंग अधिकारांचाही हात असल्याचा आरोप सरबजीतची बहीण दलबीर कौर यांनी केला आहे.
आरोपी आमेर आफताब व मुदस्सर हे दोघेही मृत्युदंडाची शिक्षा झालेले आरोपी आहेत. १९९० च्या बॉम्बस्फोटात पाक नागरिकांच्या मृत्युला ते सरबजीतला दोषी ठरवत होते. त्या तिरस्कारातुन त्यांनी हल्ला केला. पोलीस उपमहानिरीक्षक(तुरुंग) मलिक मुबाशीर यांनी चौकशीचा आपला प्राथमिक अहवाल पंजाब प्रांताच्या गृह मंत्रालयाला सादर केला.
वाचण्याची शक्यता कमी.
जीना रुग्णालयात भरती असलेल्या सरबजीतच्या प्रकृतीत ४८ तास उलटुन गेले तरीही सुधारणा दिसुन येत नाही आहे. या हल्ल्यातुन तो वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याने उपचार करणारया डॉक्टरांनी सांगितले. सरबजीत सिंगला भारतात पाठवावे व तिथे त्याला अधिक चांगले उपचार मिळु शकतील, अशी मागणी सरबजीतची पत्नी सुखप्रीत कौर यांनी केली आहे.
Friday, 26 April 2013
सरकारच्या कडक भुमिकेमुळे डॉक्टरांचा संप मागे.
२६ एप्रिल (मुंबई)
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व संप केलेल्या डॉक्टरांवरती मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे चार हजार निवासी डॉक्टरांनी चौथ्या दिवशी संप मागे घेतला. त्यामुळे सरकारी व पालिकेच्या इस्पितळांमध्ये वैद्दकीय सेवा पूर्ववत होईल.
सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न इस्पितळे व मुंबई पालिकेच्या तीन इस्पितळांतील निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी ८ पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. जे. जे. हॉस्पिटलसह काही ठिकाणी डॉक्टर आधीच रुजू झाले आहेत. जे. जे. हॉस्पिटलसह काही ठिकाणी डॉक्टर आधीच रुजू झाले आहेत. राज्यभरात इतर सरकारी इस्पितळांमधील संप मागे घेतला जात असतानाच मुंबईतील नायर, सायन व केईएम इस्पितळांमधील संप कायम होता. त्यानुसार राज्य सरकारने कडक भुमिका घेत रुजु न झालेल्या डॉक्टरांवरती मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारने काल रात्री काढला होता. त्यानुसार पोलीस कारवाई तातडीने सुरू केली जाणार होती. पण आज सायंकाळी निवासी डॉक्टरांही नमते घेत संप मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकारने जे काही दिले त्याबाबत समाधान झाल्याने डॉक्टरांनी संप मागे घेतला, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केला.
आश्वासान
- निवासी डॉक्टरांना दरमहा ५००० हजारांची वेतनवा़ढ.
- बाँडच्या एक वर्षाच्या काळात पहिल्या तीन महिन्यांत निवासी डॉक्टरांना राज्य सरकार नोकरी देऊ शकले नाही, तर त्यांना बाँडच्या बंधनातून मुक्त समजले जाईल.
- ओबीसी विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती
- निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी इस्पितळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू.
- सुरक्षारक्षकांची संख्याही वाढविली जाणार.
Subscribe to:
Posts (Atom)