२८ (लाहोर)
कोट लखपत तुरुंगात असलेल्या सरबजीत सिंगवर प्राणघातक हल्ला करणार्या हल्लेखोरांना त्याला ठारच मारायचे होते, असे समोर आले आहे. लाहोर येथील झालेल्या बॉम्बस्फोटात सरबजीतचा हात असल्याने त्याला ठार मारण्याचा कट या आरोपींनी केला, असे पोलीस चौकशीतुन पुढे आले आहे. तसेच, या हल्लामागे तुरुंग अधिकारांचाही हात असल्याचा आरोप सरबजीतची बहीण दलबीर कौर यांनी केला आहे.
आरोपी आमेर आफताब व मुदस्सर हे दोघेही मृत्युदंडाची शिक्षा झालेले आरोपी आहेत. १९९० च्या बॉम्बस्फोटात पाक नागरिकांच्या मृत्युला ते सरबजीतला दोषी ठरवत होते. त्या तिरस्कारातुन त्यांनी हल्ला केला. पोलीस उपमहानिरीक्षक(तुरुंग) मलिक मुबाशीर यांनी चौकशीचा आपला प्राथमिक अहवाल पंजाब प्रांताच्या गृह मंत्रालयाला सादर केला.
वाचण्याची शक्यता कमी.
जीना रुग्णालयात भरती असलेल्या सरबजीतच्या प्रकृतीत ४८ तास उलटुन गेले तरीही सुधारणा दिसुन येत नाही आहे. या हल्ल्यातुन तो वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याने उपचार करणारया डॉक्टरांनी सांगितले. सरबजीत सिंगला भारतात पाठवावे व तिथे त्याला अधिक चांगले उपचार मिळु शकतील, अशी मागणी सरबजीतची पत्नी सुखप्रीत कौर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment