Wednesday, 24 April 2013

यशाचे शिखर


   तुमच्या मनात जी असेल, ती नक्की पूर्ण होईल, परंतु या इच्छापूर्तीसाठी एक अट आहे. त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही तुमचे तन, मन, धन खर्च केले पाहिजे. वास्तविक तुमच्याजवळ ज्या गोष्टी आज आहेत, त्यासुध्दा तुम्हाला हव्या आहेत, म्हणून त्या तुमच्याजवळ आहेत. तुमच्या मनात जर आशावाद असेल, यशाचे विचार असतील, सुखाचे व्यवहार असतील व त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर तुमच्या विचारानुसार तुम्हाला सर्व काही मिळेल.
   तुमचे प्रयत्न सफल व्हायचे असतील तर आपले शक्ती काय आहे, ते समजुन घ्या. तुम्ही स्वत: ला दबळे समजत असाल, तर तुम्ही दुबळे राहाल, म्हणून तुम्ही नेहमी मनात सुविचार बाळगा. कारण माणसाच्या मनातील विचाराप्रमाणे त्याची पूर्ती होत असते. तुमच्या मनात 'मी यश मिळवीनच' असे विचार असतील तर तुम्ही यश मिळवालच. अनेकदा माणुस अनेकदा माणुस अडचणीच्या वेढ्यात सापडलेला असतो. त्याला सतत अपयश येत असते. त्याला आशेचा किरण कोठेच दिसत नाही, अशी बिकट परिस्थिती ओढवली तरीही तुम्ही निराश होउ नका. मनातील आशावाद सोडू नका. प्रसिध्द विश्वविजेता चंगीझखान याची एक कथा आहे. त्याचा सर्व आघाड्यांवर पराभव झाला होता. शत्रु जवळ आला होता आणि चंगीझखानाने एका पडक्या घरात आश्रय घेतला होता. तेथे तो झोपला असताना त्याला एका कोपर्यात एक कोळी जाळे विणताना दिसला. तो कोळी आपल्या शरिरातून धागा काढायचा आणि वर चिकटवायचा. तो धागा तुटून जायचा. चंगीझखानाने मोजले तेव्हा त्याला दिसले की, त्या कोळ्याने तो तुटलेला धागा शंभर वेळा जोडण्याचा  प्रयत्न केला. चंगीझखानाच्या मनात विचार आला. हा लहानसा कोळी शंभर वेळा प्रयत्न करतो, आपला तर फक्त एकदाच पराभव झाला आहे. या लहानशा निरीक्षणामुळे चंगीझखानाला प्रेरणा मिळाली आणि नंतर त्याने जग जिंकले. 
   पण सामान्य माणुस मात्र एका प्रयत्नात यश मिळाले नाही, तर सर्व  प्रयत्न सोडून देतो व निराश होतो. तो म्हणतो, 'माझ्या भाग्यातच यश नाही', पण यश तुमच्या दारातच उभे असते, यश आणि अपयश यात दोन पावलांचे अंतर असते. शेवटची दोन पावले टाकली तर तुम्हाला यश मिळण्यासारखे असते, पण ही दोन पावलेच तो टाकत नाही.

   

No comments:

Post a Comment