Thursday, 25 April 2013

चीटपंड घोटाळा- चिदंबरम यांच्या पत्नीचा सहभाग.

२५ एप्रिल (नवी दिल्ली)

   लाखो गरिब, मध्यमवर्गीय लोकांची आयुष्यभराची जमापुंजीवर डल्ला मारुन प्रकाशझोत्यात आलेल्या पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुपच्या चीटपंड घोटाळ्यात केंद्रिय अर्थमंत्री यांच्या पत्नी वकील नलिनी यांचेही नाव पुढे आले आहे. घोटाळ्याचा मुख्य आरोपी शारदा ग्रुपचा अध्यक्ष सुदीप्तो सेनने सीबीआयला 18 पानांचे पत्र पाठवले आहे. त्यात नलिनी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, त्यात तृणमूल काँग्रेसचे कुणाल घोष आणि संजय बोस या खासदारांचीही नावे आहेत. नलिनी चिंदबरम या चेन्नईतील ज्येष्ठ कायदेतजज्ञ आहेत. विशेषत: आर्थिक बाबींविषयक खटले, कंपनी लॉ या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे काम केले. परंतु नलिनी यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले आहेत.

 चिट फंड कंपन्यांवर नजर
  या पार्श्वभुमीवर  उद्योग विभागाचे मंत्री सचिन पायलट यांनी शारदा ग्रुपसह अशा प्रकारचे आरोप असलेल्या सर्व चिट फंड कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने (एसएफआयओ) विशेष कार्यदल तयार करण्याचे निर्देश बजावले गेले आहेत. पश्चिम बंगालमधील 12 ग्रुपच्या 73 कंपन्यांविरुद्ध तक्रारी आहेत.

नलिनी यांच्यावरील आरोप
   नरसिंग राव सरकारमधील मंत्री मतंग सिंग, त्यांची पत्नी मनोरंजना आणि माझी कंपनी यांच्यात नलिनी चिदंबरम यांनी डील करण्यासाठी मध्यस्थी केली. सुदीप्तो सेनने त्यांना 1 कोटीहून अधिक रक्कम दिली
   आसाममध्ये एका टीव्ही वाहिनीला सुरुवात करण्यासाठी मदत करण्याची सूचना नलिनी यांनी सुदीप्तो सेनला केली होती. त्याचबरोबर कोणताही वाद झाला तर त्याचे निपटारा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

  

No comments:

Post a Comment