सरकारी उदासीनतेमुळे सात हजार टन गहू सडला.
७ मे
(नवी दिल्ली)
देशातील ३० टक्के जनता व ४७ टक्के मुले कुपोषित असताना अयोग्य साठवणुकीमुळे गेल्या साडेतीन वर्षात सरकारी गोदामांमध्ये तब्बल ७३४० टन गहु सडुन गेल्याची धक्कादायक माहिती भारतीय अन्न महामंडळाने
दिली आहे.
उत्तर प्रदेशचे कुश कारला यांनी माहिती अधिकार वापर करुन अन्न महामंडळाकडुन ही माहिती मिळवली.
त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमध्ये वर्ष २००९-१० मध्ये २,०१० टन, वर्ष २०१०-११ मध्ये १९९७ टन व वर्ष २०११-१२ मध्ये २४०१ टन गहु सडला आहे.
अन्न महामंडळाकडुन मिळालेल्या माहितीनुसार बिहार मध्ये सर्वाधिक ३०६ टन गहु सडला. त्याखालोखाल उत्तराखंडमध्ये २२१ टन, गुजरात मध्ये १९५ टन तसेच गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजे १४४४ टन गहु महामंडळाच्या महाराष्ट्रातील गोदामांमध्ये सडला होता.
शेतमालासाठी बाजारसुविधा उपलब्ध नसणे, गोदामांची सोय नसणे इत्यादी कारणामुळे धान्याची मोठ्याप्रमाणावर नासाडी होते. रेशन व्यवस्थेसाठी धान्य खरेदी व साठवणुकीची जबाबदारी असलेल्या भारतीय अन्न महामंडळाकडे गरजेहुन खुपच तुटपूंजी म्हणजे जेमतेम ३३.९९ दशलक्ष टन एवढीच धान्य साठवणुकीची क्षमता आहे.
No comments:
Post a Comment