लातूर जिल्ह्यात एसटीमध्ये स्फोट; 19 जखमी
१० मे नळेगाव (लातुर)
लातुर जिल्यातील चाकुर तालुक्यातील नळेगावात एसटी बसमध्ये शक्तीशाली स्फोट झाला. उदगीरहून लातूरकडे निघालेल्या राज्य परिवहनच्या बसमध्ये आज सायंकाळी ७.१0 वाजता नळेगाव येथील बसस्थानकात झालेल्या स्फोटात १९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ९ जण गंभीर आहेत. बसस्फोटाच्या घटनास्थळी पोलिसांना काही जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची माहिती पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी दिली.
सर्व जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बसमध्ये नेमका स्फोट कशाचा झाला, याचा उलगडा झाला नसुन पोलीस तपास करत आहे.उदगीर आगाराची बस सायंकाळी ६ वाजता उदगीर बसस्थानकातून लातूरकडे रवाना झाली. ती लातूरपासून नळेगाव बसस्थानकात पोहोचली. प्रवाशंना उतरवून बस बंद करून चालक स्थानकात नोंद करण्यासाठी निघाला होता. तेव्हा बसमध्ये जोरदार स्फोट झाला. घटना घडली तेव्हा बसमध्ये जवळपास ५५ प्रवासी होते.
घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा काही जिलेटीनच्या कांड्याचे अवशेष पोलिसांना घटनास्थळी मिळाले आहेत. त्यामुळे जिलेटीनमुळे स्फोट झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तरी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.
पोलीस कर्मचार्यांना मारहाण
घटनास्थळी पोलिस उशिरा आल्याने पोलिसानां नागरिकांनच्या असंतोषाला सामोरे जायला लागले. काही कर्मचार्यांना यात मारहाण झाली. तसेच पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकारानंतर घटनास्थळी एटीएस, बॉम्बशोधक पथक व अधिकारी पोहोचले. त्यांनी नागरिकांना दूर करुन तपासकार्य सुरु केले होते. केबिन आणि मागचा भाग सुरक्षित असताना बसच्या मध्यभागात स्फोट झाल्याने वेगळाच संशयही व्यक्त होत आहे.
घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा काही जिलेटीनच्या कांड्याचे अवशेष पोलिसांना घटनास्थळी मिळाले आहेत. त्यामुळे जिलेटीनमुळे स्फोट झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तरी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment