Monday, 7 January 2013


फेसबुक'वर दिसल्यास ठरणार भ्रष्टाचाराचा गुन्हा 

कौलालंपूर (मलेशिया)- "फेसबुक'वर ऑनलाइन होण्याचे व्यसन कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. मलेशियातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये "फेसबुक' फीवर अगदी टोकाला गेला आहे, त्यामुळे कामाच्या वेळेत "फेसबुक'वर ऑनलाइन राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मलेशियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने घेतला आहे. 
     कामाच्या वेळेत "फेसबुक'वर वैयक्तिक चर्चा करताना कर्मचारी सापडल्यास संबंधित गुन्हेगारावर शिस्तभंगाची कारवाई होईल. संबंधित शिस्तमंडळ कर्मचाऱ्यावरील कारवाईचे स्वरूप ठरवेल. "एमएसीसी"च्या कायद्याअंतर्गत याचा समावेश झाला नसला तरी शिस्तमंडळाचा सूचना देण्याचा अधिकार "एमएसीसी'ला असल्याचे सुतीनाह यांनी स्पष्ट केले. 
     सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत फेसबुकवर असल्याची गंभीर दखल मलेशिया सरकारने घेतली आहे. मलेशियन अँन्टी करप्शन कमिशन (एमएसीसी)ने याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासंदर्भात एमएसीसी'चे मुख्य आयुक्त दकुत सुतीनाह सुतान म्हणाल्या, "सरकारी कर्मचारी ऑफिसमधील वेळेत सुमारे तीन तास फेसबुकवर वैयक्तिक गप्पा मारण्यात वेळ घालवतात, असे निदर्शनास आले आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील पूर्णवेळ कामसाठी दिला पाहिजे.'' 

No comments:

Post a Comment