आप्पा पेंडसे स्मृती व्याख्यान
व्याख्याते- माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार )
श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त)
विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई )
व्याख्याते- माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार )
श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त)
विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई )
आप्पा पेंडसे यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईतील वाहतूक समस्या या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार ), श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त) तसेच विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई ) यांनी आपापली मत मांडली.मुंबई मध्ये वाहतूक समस्या हि दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तसेच दररोज वाढणाऱ्या नवीन वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्या हि गंभीर बनत चालली आहे. रिक्षा चालकांची मुजोरी, भाडी नाकारणे अशा कारणामुळे लोकांमध्ये असंतोष हा वढतो. असे मत माधवराव शिरवाळकरांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी या संबधीत वेबसाईट यांचा उल्लेख केला.
श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक समस्या यावर मत व्यक्त केले कि मुंबईतील वाहतूक व्यवस्था हि स्वस्त व चांगली व्यवस्था आहे बेस्ट बस व्यवस्था चे उदाहरण दिले. बेस्ट हि बस व्यवस्था हि भारतातील चांगली व प्रभावी वाहतूक व्यवस्था आहे. यासंबधीत त्यांनी एक आठवण सांगितली कि ९२ च्या दंगलीनंतर रस्त्यावर सामसूम होते. लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर रिकाम्या बसेस फिरवण्याचे आदेश दिले कि ज्यामुळे लोकांमधील भीतीचे वातावरण कमी होईल. ८५% मुंबईकर बस, रेल्वेने प्रवास करतात.
या समस्या निर्माण का झाल्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले कि गेल्या १० ते २० वर्षात वाहने वाढली पण रस्ते व्यवस्था तशीच राहिली. तसेच त्यांनी हकीम अहवाल चा उल्लेख केला. वाहतूक समस्ये मुळे नवीन येणाऱ्या वाहनां च्या नोंदणी वरती बंदी घालू शकत नाही. हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील ५०% रस्त्यांचा वापर हा पार्किंगसाठी होतो व मुंबई ऑक्ट्रोय रेट हा जास्त असल्यामुळे वाहनांची नोंद हि ठाणे, नवी मुंबई, भिवंडी ला होते.
श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक समस्येवर सांगितले उपाय.
१) पार्किंग रेट वाढवणे.
२) नागरिकाला तो राहण्याच्या विभागात नोकरी दिल्यास त्याचा प्रवास कमी होईल. तसेच घरासंबंधी stamp व registration fee कमी केली पाहिजे.
३) कार्यालयीन कामात इंटरनेट वापर केला तर काही काम घरी करण्यास मदत होईल.
वाहतूक समस्या म्हणजे वाहतूक पोलिस असे समीकरण बनल्याची खंत वाहतूक पोलिस उपायुक्त विवेक फळसणकर
यांनी व्यक्त केले. वाहतूक समस्या बरोबर वाहतूक पोलिसांना सामोऱ्या जाण्यारया अडचणी सुद्धा लोकांनी लक्षात घ्यावे असे आवाहन फळसणकरांनी केले. तसेच ट्राफिक हवालदाराबरोबर १ तास काम करून बघा व ते रोज कुठल्या अडचणींना सामोरे जातात हे कळेल. लोकांची मानसिकता भावनाशुन्य होत चालली आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केले. यावर उपाय म्हणुन उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. तसेच लोकांच्या मानसिकता बदल घडायला हवा. अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment