Friday, 26 April 2013

सरकारच्या कडक भुमिकेमुळे डॉक्टरांचा संप मागे.

२६ एप्रिल (मुंबई)

   उच्च  न्यायालयाने  दिलेल्या  आदेशानुसार व  संप  केलेल्या  डॉक्टरांवरती  मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारने  घेतलेल्या  निर्णयामुळे  चार हजार निवासी  डॉक्टरांनी चौथ्या दिवशी संप मागे घेतला. त्यामुळे सरकारी व  पालिकेच्या  इस्पितळांमध्ये  वैद्दकीय  सेवा  पूर्ववत होईल. 
   सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न इस्पितळे व मुंबई पालिकेच्या तीन इस्पितळांतील निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी ८ पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. जे. जे. हॉस्पिटलसह काही ठिकाणी डॉक्टर आधीच रुजू झाले आहेत. जे. जे. हॉस्पिटलसह काही ठिकाणी डॉक्टर आधीच रुजू झाले आहेत. राज्यभरात इतर सरकारी इस्पितळांमधील संप मागे घेतला जात असतानाच मुंबईतील नायर, सायन व केईएम इस्पितळांमधील संप कायम होता. त्यानुसार राज्य सरकारने कडक भुमिका घेत रुजु न झालेल्या डॉक्टरांवरती मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारने काल रात्री काढला होता. त्यानुसार पोलीस कारवाई तातडीने सुरू केली जाणार होती. पण आज सायंकाळी निवासी डॉक्टरांही नमते घेत संप मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकारने जे काही दिले त्याबाबत समाधान झाल्याने डॉक्टरांनी संप मागे घेतला, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केला. 

आश्वासान
- निवासी डॉक्टरांना दरमहा ५००० हजारांची वेतनवा़ढ. 
- बाँडच्या एक वर्षाच्या काळात पहिल्या तीन महिन्यांत निवासी डॉक्टरांना राज्य सरकार नोकरी देऊ शकले नाही, तर त्यांना बाँडच्या बंधनातून मुक्त समजले जाईल. 
- ओबीसी विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती 
- निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी इस्पितळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू. 
- सुरक्षारक्षकांची संख्याही वाढविली जाणार.

Thursday, 25 April 2013

चीटपंड घोटाळा- चिदंबरम यांच्या पत्नीचा सहभाग.

२५ एप्रिल (नवी दिल्ली)

   लाखो गरिब, मध्यमवर्गीय लोकांची आयुष्यभराची जमापुंजीवर डल्ला मारुन प्रकाशझोत्यात आलेल्या पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुपच्या चीटपंड घोटाळ्यात केंद्रिय अर्थमंत्री यांच्या पत्नी वकील नलिनी यांचेही नाव पुढे आले आहे. घोटाळ्याचा मुख्य आरोपी शारदा ग्रुपचा अध्यक्ष सुदीप्तो सेनने सीबीआयला 18 पानांचे पत्र पाठवले आहे. त्यात नलिनी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, त्यात तृणमूल काँग्रेसचे कुणाल घोष आणि संजय बोस या खासदारांचीही नावे आहेत. नलिनी चिंदबरम या चेन्नईतील ज्येष्ठ कायदेतजज्ञ आहेत. विशेषत: आर्थिक बाबींविषयक खटले, कंपनी लॉ या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे काम केले. परंतु नलिनी यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले आहेत.

 चिट फंड कंपन्यांवर नजर
  या पार्श्वभुमीवर  उद्योग विभागाचे मंत्री सचिन पायलट यांनी शारदा ग्रुपसह अशा प्रकारचे आरोप असलेल्या सर्व चिट फंड कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने (एसएफआयओ) विशेष कार्यदल तयार करण्याचे निर्देश बजावले गेले आहेत. पश्चिम बंगालमधील 12 ग्रुपच्या 73 कंपन्यांविरुद्ध तक्रारी आहेत.

नलिनी यांच्यावरील आरोप
   नरसिंग राव सरकारमधील मंत्री मतंग सिंग, त्यांची पत्नी मनोरंजना आणि माझी कंपनी यांच्यात नलिनी चिदंबरम यांनी डील करण्यासाठी मध्यस्थी केली. सुदीप्तो सेनने त्यांना 1 कोटीहून अधिक रक्कम दिली
   आसाममध्ये एका टीव्ही वाहिनीला सुरुवात करण्यासाठी मदत करण्याची सूचना नलिनी यांनी सुदीप्तो सेनला केली होती. त्याचबरोबर कोणताही वाद झाला तर त्याचे निपटारा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

  

Wednesday, 24 April 2013

यशाचे शिखर


   तुमच्या मनात जी असेल, ती नक्की पूर्ण होईल, परंतु या इच्छापूर्तीसाठी एक अट आहे. त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही तुमचे तन, मन, धन खर्च केले पाहिजे. वास्तविक तुमच्याजवळ ज्या गोष्टी आज आहेत, त्यासुध्दा तुम्हाला हव्या आहेत, म्हणून त्या तुमच्याजवळ आहेत. तुमच्या मनात जर आशावाद असेल, यशाचे विचार असतील, सुखाचे व्यवहार असतील व त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर तुमच्या विचारानुसार तुम्हाला सर्व काही मिळेल.
   तुमचे प्रयत्न सफल व्हायचे असतील तर आपले शक्ती काय आहे, ते समजुन घ्या. तुम्ही स्वत: ला दबळे समजत असाल, तर तुम्ही दुबळे राहाल, म्हणून तुम्ही नेहमी मनात सुविचार बाळगा. कारण माणसाच्या मनातील विचाराप्रमाणे त्याची पूर्ती होत असते. तुमच्या मनात 'मी यश मिळवीनच' असे विचार असतील तर तुम्ही यश मिळवालच. अनेकदा माणुस अनेकदा माणुस अडचणीच्या वेढ्यात सापडलेला असतो. त्याला सतत अपयश येत असते. त्याला आशेचा किरण कोठेच दिसत नाही, अशी बिकट परिस्थिती ओढवली तरीही तुम्ही निराश होउ नका. मनातील आशावाद सोडू नका. प्रसिध्द विश्वविजेता चंगीझखान याची एक कथा आहे. त्याचा सर्व आघाड्यांवर पराभव झाला होता. शत्रु जवळ आला होता आणि चंगीझखानाने एका पडक्या घरात आश्रय घेतला होता. तेथे तो झोपला असताना त्याला एका कोपर्यात एक कोळी जाळे विणताना दिसला. तो कोळी आपल्या शरिरातून धागा काढायचा आणि वर चिकटवायचा. तो धागा तुटून जायचा. चंगीझखानाने मोजले तेव्हा त्याला दिसले की, त्या कोळ्याने तो तुटलेला धागा शंभर वेळा जोडण्याचा  प्रयत्न केला. चंगीझखानाच्या मनात विचार आला. हा लहानसा कोळी शंभर वेळा प्रयत्न करतो, आपला तर फक्त एकदाच पराभव झाला आहे. या लहानशा निरीक्षणामुळे चंगीझखानाला प्रेरणा मिळाली आणि नंतर त्याने जग जिंकले. 
   पण सामान्य माणुस मात्र एका प्रयत्नात यश मिळाले नाही, तर सर्व  प्रयत्न सोडून देतो व निराश होतो. तो म्हणतो, 'माझ्या भाग्यातच यश नाही', पण यश तुमच्या दारातच उभे असते, यश आणि अपयश यात दोन पावलांचे अंतर असते. शेवटची दोन पावले टाकली तर तुम्हाला यश मिळण्यासारखे असते, पण ही दोन पावलेच तो टाकत नाही.

   

Tuesday, 23 April 2013

'मनरेगा' त अनियमितता - कॅग

२४ एप्रिल

   युपीए सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनातील गैरव्यवहार कॅगने उघडकीस आणला आहे. अनेक राज्यांतील लोक योजनेपासुन वंचित असुन, जॉब कार्डामध्ये बोगस कामे आहेत. निधी वळविण्यासह आणि १९६०.४५ कोटी रुपयांची निकषबाह्य कामे करवुन घेण्यात आली. तसेच ४००० कोटी रुपयांची कामे अर्पुणावस्थेत असुन महाराष्ट्रात कामे  अपुर्ण राहण्याचे प्रमाण जास्त आहे, असा उल्लेखही अहवालात आहे.

                                             

धोरणात गोंधळ

१. ही योजना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने सन २००६ मध्ये सुरु करण्यात आली. 
२.१३ हजार कोटी रुपयांची खैरात वाटली गेली. योजनेचा फायदा गरजु आणि पात्र लोकांपर्यत पोहोचला नाही.
३.मंजुरीच नसलेल्या १ लाख २१०० कामांवर तब्बल २ हजार २५२.४३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. 
४.जेथे मनरेगाच्या कामांची अत्यंत गरज होती. तेथे ४०७० कोटी रुपयांची कामे ५ वर्षापासुन प्रलंबित आहेत.            
५.१४ राज्याच्या मनरेगाच्या सव्वा लाख जॉब कार्डसमध्ये फोटोच नाही, म्हणजेच ती बनावटच होती. 
६.२००९-१० वर्षात सरासरी ५४ दिवसकाम झाले. २०११-१२ मध्ये ते घटुन ४३ दिवस काम झाले. 

  मनरेगा घोटाळ्यावरुन मंगळवारी दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. 


Monday, 22 April 2013

बांगलादेशच्या अध्यक्षपदी अब्दुल हमीद.

   
                              


    बांगलादेशच्या अध्यक्षपदी बांगलादेश संसद अध्यक्ष अब्दुल हमीद यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बांगलादेशचे विसावे अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.
   राष्ट्रध्यक्ष जिलुर रेहमान यांच्या मृत्युनंतर हामीद काळजीवाहु राष्ट्रध्यक्ष काम पाहत होते. त्यानुसार हमीद यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी बांगलादेश आवामी लीगचे उमेदवार म्हणुन त्यांनी रविवारी अर्ज दाखल केला. हामीद १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र लढ्यात सहभागी झाले होते. १९८६, १९९१, २००१ आणि २००८ मध्ये ते संसदेवर निवडुन गेले होते.

Tuesday, 16 April 2013


अमेरिकेतील  बोस्टन  शहरात  स्फोट- ३ठार

बोस्टन- अमेरिकेतील बोस्टन शहरात स्थानिक वेळेनुसार दुपारी मॅरेथान दरम्यान झालेल्या दोन बॉम्बस्फोटात ३ ठार, तर शेकडो जखमी झाले आहे. हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
     भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास  दोन्ही स्फोट झाले. या साखळी
स्फोटांत अवघ्या १५ ते २० सेकंदांचे अंतर होते. फिनिशलाइनपासुन २५० मीटर अंतरावर पहिल्या
प्रेक्षक गॅलरीत हे स्फोट झाले. त्यानंतर थोड्या वेळेने जेएफके लायब्ररीत तिसरा स्फोट झाला.मॅडेरीन हॉटलमध्ये एक जिवंत बॉम्बही पोलिसांच्या हाती लागला. तो निकामी करण्यात आला आहे.
     या स्फोटानंतर राष्ट्राला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की या 
स्फोटाबद्दल दोषी असलेल्यांना शोधण्यात येईल. स्फोटामागे दहशतवाद्दांचा हात असल्याचे अद्दाप
निश्चित नसुन याचा शोध घेण्यात येत आहे, अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन  बोस्टन
वासियांना सहकार्य केले पाहिजे.

Thursday, 21 February 2013

आप्पा  पेंडसे  स्मृती व्याख्यान                                                                                                              

व्याख्याते-   माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार )
                   श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त)
                   विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई )

       आप्पा  पेंडसे  यांच्या स्मृती दिनानिमित्त  मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईतील वाहतूक समस्या  या विषयावर व्याख्यान  आयोजित केले होते. या कार्यक्रमात माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार ), श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त) तसेच विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई ) यांनी आपापली मत मांडली.मुंबई मध्ये  वाहतूक समस्या   हि दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तसेच दररोज वाढणाऱ्या नवीन वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची  समस्या हि गंभीर बनत चालली आहे. रिक्षा  चालकांची मुजोरी, भाडी नाकारणे अशा कारणामुळे  लोकांमध्ये असंतोष हा वढतो. असे मत माधवराव शिरवाळकरांनी  व्यक्त केले. तसेच त्यांनी या संबधीत वेबसाईट यांचा उल्लेख केला.  
       श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक  समस्या यावर मत व्यक्त केले कि मुंबईतील वाहतूक व्यवस्था हि स्वस्त व चांगली व्यवस्था आहे बेस्ट बस व्यवस्था चे उदाहरण दिले. बेस्ट हि बस व्यवस्था   हि भारतातील चांगली व प्रभावी वाहतूक  व्यवस्था  आहे. यासंबधीत त्यांनी एक आठवण सांगितली कि ९२ च्या दंगलीनंतर रस्त्यावर सामसूम होते. लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी  रस्त्यावर रिकाम्या बसेस फिरवण्याचे आदेश दिले कि ज्यामुळे लोकांमधील  भीतीचे वातावरण कमी होईल. ८५% मुंबईकर बस, रेल्वेने प्रवास करतात. 
       या  समस्या  निर्माण का झाल्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले कि गेल्या १० ते २० वर्षात वाहने वाढली पण रस्ते व्यवस्था तशीच राहिली.  तसेच त्यांनी हकीम अहवाल चा उल्लेख केला. वाहतूक समस्ये मुळे  नवीन येणाऱ्या वाहनां च्या नोंदणी वरती बंदी घालू शकत नाही. हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील ५०% रस्त्यांचा वापर हा पार्किंगसाठी होतो व मुंबई ऑक्ट्रोय रेट  हा जास्त असल्यामुळे वाहनांची नोंद हि ठाणे, नवी मुंबई, भिवंडी ला होते. 

श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक   समस्येवर सांगितले उपाय. 
१) पार्किंग रेट  वाढवणे.
२) नागरिकाला तो राहण्याच्या विभागात नोकरी दिल्यास त्याचा प्रवास कमी होईल. तसेच घरासंबंधी stamp      व registration fee  कमी केली पाहिजे. 
३) कार्यालयीन कामात इंटरनेट वापर केला तर काही काम घरी करण्यास मदत होईल.  
        
 
वाहतूक समस्या  म्हणजे वाहतूक पोलिस असे समीकरण बनल्याची खंत वाहतूक पोलिस उपायुक्त विवेक फळसणकर
यांनी व्यक्त केले.  वाहतूक  समस्या बरोबर वाहतूक पोलिसांना सामोऱ्या जाण्यारया अडचणी सुद्धा लोकांनी लक्षात घ्यावे असे आवाहन  फळसणकरांनी केले. तसेच ट्राफिक हवालदाराबरोबर १ तास काम करून बघा व ते रोज कुठल्या अडचणींना सामोरे जातात हे कळेल. लोकांची मानसिकता भावनाशुन्य होत चालली आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केले.  यावर उपाय म्हणुन उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. तसेच लोकांच्या मानसिकता बदल घडायला हवा. अशी त्यांनी इच्छा व्यक्त  केली.