Wednesday, 24 April 2013

यशाचे शिखर


   तुमच्या मनात जी असेल, ती नक्की पूर्ण होईल, परंतु या इच्छापूर्तीसाठी एक अट आहे. त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही तुमचे तन, मन, धन खर्च केले पाहिजे. वास्तविक तुमच्याजवळ ज्या गोष्टी आज आहेत, त्यासुध्दा तुम्हाला हव्या आहेत, म्हणून त्या तुमच्याजवळ आहेत. तुमच्या मनात जर आशावाद असेल, यशाचे विचार असतील, सुखाचे व्यवहार असतील व त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर तुमच्या विचारानुसार तुम्हाला सर्व काही मिळेल.
   तुमचे प्रयत्न सफल व्हायचे असतील तर आपले शक्ती काय आहे, ते समजुन घ्या. तुम्ही स्वत: ला दबळे समजत असाल, तर तुम्ही दुबळे राहाल, म्हणून तुम्ही नेहमी मनात सुविचार बाळगा. कारण माणसाच्या मनातील विचाराप्रमाणे त्याची पूर्ती होत असते. तुमच्या मनात 'मी यश मिळवीनच' असे विचार असतील तर तुम्ही यश मिळवालच. अनेकदा माणुस अनेकदा माणुस अडचणीच्या वेढ्यात सापडलेला असतो. त्याला सतत अपयश येत असते. त्याला आशेचा किरण कोठेच दिसत नाही, अशी बिकट परिस्थिती ओढवली तरीही तुम्ही निराश होउ नका. मनातील आशावाद सोडू नका. प्रसिध्द विश्वविजेता चंगीझखान याची एक कथा आहे. त्याचा सर्व आघाड्यांवर पराभव झाला होता. शत्रु जवळ आला होता आणि चंगीझखानाने एका पडक्या घरात आश्रय घेतला होता. तेथे तो झोपला असताना त्याला एका कोपर्यात एक कोळी जाळे विणताना दिसला. तो कोळी आपल्या शरिरातून धागा काढायचा आणि वर चिकटवायचा. तो धागा तुटून जायचा. चंगीझखानाने मोजले तेव्हा त्याला दिसले की, त्या कोळ्याने तो तुटलेला धागा शंभर वेळा जोडण्याचा  प्रयत्न केला. चंगीझखानाच्या मनात विचार आला. हा लहानसा कोळी शंभर वेळा प्रयत्न करतो, आपला तर फक्त एकदाच पराभव झाला आहे. या लहानशा निरीक्षणामुळे चंगीझखानाला प्रेरणा मिळाली आणि नंतर त्याने जग जिंकले. 
   पण सामान्य माणुस मात्र एका प्रयत्नात यश मिळाले नाही, तर सर्व  प्रयत्न सोडून देतो व निराश होतो. तो म्हणतो, 'माझ्या भाग्यातच यश नाही', पण यश तुमच्या दारातच उभे असते, यश आणि अपयश यात दोन पावलांचे अंतर असते. शेवटची दोन पावले टाकली तर तुम्हाला यश मिळण्यासारखे असते, पण ही दोन पावलेच तो टाकत नाही.

   

Tuesday, 23 April 2013

'मनरेगा' त अनियमितता - कॅग

२४ एप्रिल

   युपीए सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनातील गैरव्यवहार कॅगने उघडकीस आणला आहे. अनेक राज्यांतील लोक योजनेपासुन वंचित असुन, जॉब कार्डामध्ये बोगस कामे आहेत. निधी वळविण्यासह आणि १९६०.४५ कोटी रुपयांची निकषबाह्य कामे करवुन घेण्यात आली. तसेच ४००० कोटी रुपयांची कामे अर्पुणावस्थेत असुन महाराष्ट्रात कामे  अपुर्ण राहण्याचे प्रमाण जास्त आहे, असा उल्लेखही अहवालात आहे.

                                             

धोरणात गोंधळ

१. ही योजना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने सन २००६ मध्ये सुरु करण्यात आली. 
२.१३ हजार कोटी रुपयांची खैरात वाटली गेली. योजनेचा फायदा गरजु आणि पात्र लोकांपर्यत पोहोचला नाही.
३.मंजुरीच नसलेल्या १ लाख २१०० कामांवर तब्बल २ हजार २५२.४३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. 
४.जेथे मनरेगाच्या कामांची अत्यंत गरज होती. तेथे ४०७० कोटी रुपयांची कामे ५ वर्षापासुन प्रलंबित आहेत.            
५.१४ राज्याच्या मनरेगाच्या सव्वा लाख जॉब कार्डसमध्ये फोटोच नाही, म्हणजेच ती बनावटच होती. 
६.२००९-१० वर्षात सरासरी ५४ दिवसकाम झाले. २०११-१२ मध्ये ते घटुन ४३ दिवस काम झाले. 

  मनरेगा घोटाळ्यावरुन मंगळवारी दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. 


Monday, 22 April 2013

बांगलादेशच्या अध्यक्षपदी अब्दुल हमीद.

   
                              


    बांगलादेशच्या अध्यक्षपदी बांगलादेश संसद अध्यक्ष अब्दुल हमीद यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बांगलादेशचे विसावे अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.
   राष्ट्रध्यक्ष जिलुर रेहमान यांच्या मृत्युनंतर हामीद काळजीवाहु राष्ट्रध्यक्ष काम पाहत होते. त्यानुसार हमीद यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी बांगलादेश आवामी लीगचे उमेदवार म्हणुन त्यांनी रविवारी अर्ज दाखल केला. हामीद १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र लढ्यात सहभागी झाले होते. १९८६, १९९१, २००१ आणि २००८ मध्ये ते संसदेवर निवडुन गेले होते.

Tuesday, 16 April 2013


अमेरिकेतील  बोस्टन  शहरात  स्फोट- ३ठार

बोस्टन- अमेरिकेतील बोस्टन शहरात स्थानिक वेळेनुसार दुपारी मॅरेथान दरम्यान झालेल्या दोन बॉम्बस्फोटात ३ ठार, तर शेकडो जखमी झाले आहे. हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
     भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास  दोन्ही स्फोट झाले. या साखळी
स्फोटांत अवघ्या १५ ते २० सेकंदांचे अंतर होते. फिनिशलाइनपासुन २५० मीटर अंतरावर पहिल्या
प्रेक्षक गॅलरीत हे स्फोट झाले. त्यानंतर थोड्या वेळेने जेएफके लायब्ररीत तिसरा स्फोट झाला.मॅडेरीन हॉटलमध्ये एक जिवंत बॉम्बही पोलिसांच्या हाती लागला. तो निकामी करण्यात आला आहे.
     या स्फोटानंतर राष्ट्राला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की या 
स्फोटाबद्दल दोषी असलेल्यांना शोधण्यात येईल. स्फोटामागे दहशतवाद्दांचा हात असल्याचे अद्दाप
निश्चित नसुन याचा शोध घेण्यात येत आहे, अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन  बोस्टन
वासियांना सहकार्य केले पाहिजे.

Thursday, 21 February 2013

आप्पा  पेंडसे  स्मृती व्याख्यान                                                                                                              

व्याख्याते-   माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार )
                   श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त)
                   विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई )

       आप्पा  पेंडसे  यांच्या स्मृती दिनानिमित्त  मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईतील वाहतूक समस्या  या विषयावर व्याख्यान  आयोजित केले होते. या कार्यक्रमात माधवराव शिरवाळकर (ज्येष्ठ पत्रकार ), श्री. व्ही. एन. मोरे (मोटार वाहन विभाग आयुक्त) तसेच विवेक फळसणकर (वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई ) यांनी आपापली मत मांडली.मुंबई मध्ये  वाहतूक समस्या   हि दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तसेच दररोज वाढणाऱ्या नवीन वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची  समस्या हि गंभीर बनत चालली आहे. रिक्षा  चालकांची मुजोरी, भाडी नाकारणे अशा कारणामुळे  लोकांमध्ये असंतोष हा वढतो. असे मत माधवराव शिरवाळकरांनी  व्यक्त केले. तसेच त्यांनी या संबधीत वेबसाईट यांचा उल्लेख केला.  
       श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक  समस्या यावर मत व्यक्त केले कि मुंबईतील वाहतूक व्यवस्था हि स्वस्त व चांगली व्यवस्था आहे बेस्ट बस व्यवस्था चे उदाहरण दिले. बेस्ट हि बस व्यवस्था   हि भारतातील चांगली व प्रभावी वाहतूक  व्यवस्था  आहे. यासंबधीत त्यांनी एक आठवण सांगितली कि ९२ च्या दंगलीनंतर रस्त्यावर सामसूम होते. लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी  रस्त्यावर रिकाम्या बसेस फिरवण्याचे आदेश दिले कि ज्यामुळे लोकांमधील  भीतीचे वातावरण कमी होईल. ८५% मुंबईकर बस, रेल्वेने प्रवास करतात. 
       या  समस्या  निर्माण का झाल्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले कि गेल्या १० ते २० वर्षात वाहने वाढली पण रस्ते व्यवस्था तशीच राहिली.  तसेच त्यांनी हकीम अहवाल चा उल्लेख केला. वाहतूक समस्ये मुळे  नवीन येणाऱ्या वाहनां च्या नोंदणी वरती बंदी घालू शकत नाही. हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील ५०% रस्त्यांचा वापर हा पार्किंगसाठी होतो व मुंबई ऑक्ट्रोय रेट  हा जास्त असल्यामुळे वाहनांची नोंद हि ठाणे, नवी मुंबई, भिवंडी ला होते. 

श्री. व्ही. एन. मोरे यांनी वाहतूक   समस्येवर सांगितले उपाय. 
१) पार्किंग रेट  वाढवणे.
२) नागरिकाला तो राहण्याच्या विभागात नोकरी दिल्यास त्याचा प्रवास कमी होईल. तसेच घरासंबंधी stamp      व registration fee  कमी केली पाहिजे. 
३) कार्यालयीन कामात इंटरनेट वापर केला तर काही काम घरी करण्यास मदत होईल.  
        
 
वाहतूक समस्या  म्हणजे वाहतूक पोलिस असे समीकरण बनल्याची खंत वाहतूक पोलिस उपायुक्त विवेक फळसणकर
यांनी व्यक्त केले.  वाहतूक  समस्या बरोबर वाहतूक पोलिसांना सामोऱ्या जाण्यारया अडचणी सुद्धा लोकांनी लक्षात घ्यावे असे आवाहन  फळसणकरांनी केले. तसेच ट्राफिक हवालदाराबरोबर १ तास काम करून बघा व ते रोज कुठल्या अडचणींना सामोरे जातात हे कळेल. लोकांची मानसिकता भावनाशुन्य होत चालली आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केले.  यावर उपाय म्हणुन उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. तसेच लोकांच्या मानसिकता बदल घडायला हवा. अशी त्यांनी इच्छा व्यक्त  केली.  






Thursday, 17 January 2013


मुंबई महिलांसाठी किती सुरक्षित?

         देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारामुळे महिलांचा सुरक्षेचा मुद्दा हा चर्चेत आला. अत्याचाराविरोधात देशात विविध ठिकाणी निर्दशने झाली. उगवत्या पिढीने या चळवळीत भाग घेतला. अत्याचाराविरोधात रस्तावर आली. लोकशाहित अन्यायाविरोधात आवाज उठवला जात आहे, हि जाणीव व संवेदनशीलता महत्वाची आहे.
        दिल्लीतील महिला किती सुरक्षित आहेत, याविषयी चर्चा आतापर्यंत अनेकदा झाल्या. त्याचवेळी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या आणि चोरी, दंगली अशा प्रश्नाने घेरले्ल्या मुंबईत महिलांची सुरक्षा हा प्रश्न ही आपोआपच येतो. मुंबईत महिला १००टक्के सुरक्षित आहे असे अजिबात नाही. मात्र दिल्लीसारख्या शहराची तुलना करता मुंबई महिलांसाठी अजुनपर्यंत किमान सुरक्षित आहे असेच दिसते. आजही रात्री उशिरापर्यंत येथील नोकरदार तसेच गृहिणी फिरु शकतात.त्यांना धोका नाही असे नाही, पण दिल्लीसारख्या भयंकर भीतीच्या सावटाखाली मुंबईतील महिला नाहित हेही खरेच.
                                       
        दिल्लीतील नोकरदार ज्यांच्या कुटुंबातील मुली शिक्षण वा नोकरी-व्यवसायनिमित्ताने मुंबईकर झाल्या आहेत, अशा महिलांना महिला अत्याचारांबाबत मुंबईची अद्दापि दिल्ली झालेली नाही असे वाटते.
        अनुजा शर्मा, विद्यार्थिनी ही मुळची दिल्लीची पण मुंबईत स्थायिक झाली. तसेच  मुळच्या मुंबईच्या असलेल्या जयश्री पाटील या गृहिणी आहेत यांचे अनुभव लक्षात घेण्याजोग आहे. 
  
        रस्तावरुन चालणारया महिलेला गाडीत टाकायचे. निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करुन कुठल्याशा रस्त्यावर आ़डवाटेवर फेकुन द्दायचं या घटना दिल्लीकरांना नविन नाहीत म्हणुनच कदाचित त्या तरुणी व तिच्या मित्राच्या मदतीला जावं असे दिल्लीकरांना त्या रात्री वाटले नाही. पण हीच घटना जर मुंबईत झाली असती तर त्या मुलीच्या उघ़ड्या जखमी शरीराला झाकण्यासाठी हजारो हात मध्यरात्रीच्या वेळीही पुढे आले असते. म्हणुन आम्हाला मुंबई अधिक जवळची व सुरक्षित वाटते. कारण अजुन तरी मुंबईच्या संवेदना बोथट झालेल्या नाहीत.
                                                                                            ...अनुजा शर्मा (विद्यार्थिनी)

       महाराष्ट्रायीय संस्क्रृतीमुळे आज महाराष्टात थोड्याप्रमाणात का होईना पण संवेदना जागृत आहे. अजुन ही आम्ही खरेदीसाठी एकट्या बाहेर पडतो. काही प्रमाणात महिलांना आदर दिला जातो. मुंबईत आम्हाला गर्दीची भीती नाही तर आधार वाटतो.
                                                                                                ....जयश्री पाटिल (मालाड)

       प्रख्यात गायक रब्बी शेरगील यांनी आपली वेगळे मत मांडली आहेत.  शेरगील म्हणतात की, भारताच्या उत्तर भागात महिलांवर प्रेम करण्याची संस्क्रृती नाही. महाराष्ट्र आणि इतर भागात प्रेमची संस्क्रृती आहे. उत्तरेत ती नाही याची कारणं ही ऐतिहासिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवर आहेत. महिला ही उपभोगाची वस्तु आहे हाच विचार इथे दृढमुल झालेला आहे. ज्यावेळी परकीयांची आक्रमणं होत होती त्यावेळेस महिलांना आधी लुटलं जायचं. या सगळ्याचा परिणाम इथल्या सामाजिक मानसिकतेवर झालेला असल्याचं शेरगील सांगतात. 
       मला वैयक्तिक रित्या वाटते कि मुंबईत अजुनतरी महिला किमान सुरक्षित आहेत. आजुबाजुच्या संशयी वातावरणाचा दडपण महिलांवरती येते. पण घाबरुन जाऊन  महिला घरी बसत नाही आहेत. ही बाब महत्वाची आहे.
      समाजातील जाणीव व सुसंस्कृतपणाचा भाग सोडला तर मुळ अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या व्यवस्थेतील उणीवा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. महिलांनी रात्री-अपरात्री बाहेर पडु नये, घर सांभाळावे असे उपदेश देणारे ही लोक समाजात वावरत आहे. त्यातच चित्रपटात दाखविली जाणारी अश्लिलता,  स्वस्तात उपलब्ध असणारे अश्लिल साहित्य याचा देखील काही प्रमाणात परिणाम समाजावर पडत आहे.

       यावर उपाय म्हणुन सरकारने आपल्या व्यवस्थेत बदल करायला हवा. 

१) शिक्षण व्यवस्थेत  आमुलाग्र बदल करायला हवा. ज्या वयात मुलांना लैंगिक प्रश्न पडतात. त्या वयात पालकांनी व शिक्षकांनी समुपदेशन करायची आवश्यकता आहे. त्यांना वाढत्या वयात होणारया शारिरिक बदलाची माहिती देणे गरजेचे आहे. 

२) अत्याचारग्रस्त महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन पोलीस व न्याययंत्रणेने बदलला पाहिजे. 

३) अत्याचार गुन्हांची चौकशी करण्यासाठी वेगळी पोलीसयंत्रणा हवी. अशा यंत्रणाना पुरेशे प्रशिक्षण देण्यात यावे. 

४) बलात्काराची व्याख्या बदलुन अजुन त्याची व्याप्ती वाढवायला हवी, अत्याचारग्रस्त महिलेला संरक्षण मिळाले पाहिजे.

     शेवटी हा पुरुषी अहंकाराचा, दृष्टीकोनाचा प्रश्न आहे. पुरुषांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. अन्यायाविरोधात लढण्याची गरज आहे.  उद्या आपल्या तसेच कोणाच्या ही आई-बहिणीवर अशा प्रसंग न येवो यासाठी आपण एकजुठीने या समस्येविरोधात उभे राहणे गरजेचे आहे.




Monday, 7 January 2013


फेसबुक'वर दिसल्यास ठरणार भ्रष्टाचाराचा गुन्हा 

कौलालंपूर (मलेशिया)- "फेसबुक'वर ऑनलाइन होण्याचे व्यसन कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. मलेशियातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये "फेसबुक' फीवर अगदी टोकाला गेला आहे, त्यामुळे कामाच्या वेळेत "फेसबुक'वर ऑनलाइन राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मलेशियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने घेतला आहे. 
     कामाच्या वेळेत "फेसबुक'वर वैयक्तिक चर्चा करताना कर्मचारी सापडल्यास संबंधित गुन्हेगारावर शिस्तभंगाची कारवाई होईल. संबंधित शिस्तमंडळ कर्मचाऱ्यावरील कारवाईचे स्वरूप ठरवेल. "एमएसीसी"च्या कायद्याअंतर्गत याचा समावेश झाला नसला तरी शिस्तमंडळाचा सूचना देण्याचा अधिकार "एमएसीसी'ला असल्याचे सुतीनाह यांनी स्पष्ट केले. 
     सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत फेसबुकवर असल्याची गंभीर दखल मलेशिया सरकारने घेतली आहे. मलेशियन अँन्टी करप्शन कमिशन (एमएसीसी)ने याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासंदर्भात एमएसीसी'चे मुख्य आयुक्त दकुत सुतीनाह सुतान म्हणाल्या, "सरकारी कर्मचारी ऑफिसमधील वेळेत सुमारे तीन तास फेसबुकवर वैयक्तिक गप्पा मारण्यात वेळ घालवतात, असे निदर्शनास आले आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील पूर्णवेळ कामसाठी दिला पाहिजे.''