Tuesday, 18 December 2012
पाक पोलिओ मोहिमेतील पाच कार्यकर्त्यांची हत्या
पीटीआय
कराची
पाकिस्तानमधील पोलिओ निर्मूलन अभियान पाच कार्यकर्त्यांची निघृण हत्या
करण्यात आली. कराची शहराच्या विविध भागात आणि पेशावरमध्ये मंगळवारी
झालेल्या या भीषण हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षाच्या
मुलीचा समावेश आहे.
यातील पहिला हल्ला गुलशन-ए-बुनीर भागात नसीम आणि कानीझ या
महिला कर्मचारी पोलिओ बुथची व्यवस्था पाहात असताना झाला. त्यात महिला
जागीच ठार झाल्या. त्यानंतर अर्ध्या तासातच ओरंगी भागात अज्ञात बंदुकधारी
लोकांनी एका महिला आणि एका पुरूष पोलिओ कर्मचारीला ठार केले. सोमवारी
एका पोलिओ निर्मूलन अभियान कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. मृतांची
एकुण आकडा सहा झाला आहे.
या घटनांनंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने पोलिओ निर्मूलन अभियान स्थगित केले.
अतिरेक्यांचा या मोहिमेस प्रथमपासुन तीव्र विरोध आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment