७५0 कोटींचे संपत्ती.
दि. १२मे कोलकाता
शारदा चिटफंड मुख्य सूत्रधार सुदिप्तो सेन व साथीदारांची संपत्ती उघड.
चिटफंडच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडविणारा शारदा समूहाचा प्रमुख सुदिप्तो सेन आणि त्याच्या कंपनीतील वरिष्ठ साथीदारांची ७५0 कोटी रुपये किमतीची मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली आहे.
कंपनीच्या अधिकार्यांनी रक्कम घेऊन जाण्यासाठी वापरलेल्या सहा मोटारसायकलीसुद्धा जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकलींना विशिष्ट संकेत देण्यासाठी लाल दिवा व हॉर्न लावलेले आढळून आले. शारदा समूहाच्या कार्यालयातील एका गॅरेजमध्ये ही वाहने आढळली, अशी माहिती पोलीसांनी दिली. विधाननगरचे पोलीस उपायुक्त अर्णव घोष यांनी अटकेत असलेल्या सेन याची आतापर्यंत सुमारे ७५0 कोटी रुपये किमतीची मालमत्ता शोधून काढण्यात यश आल्याचे सांगितले. या पश्चिम बंगालातील आजवरच्या सर्वांत मोठय़ा आर्थिक घोटाळ्याचा तपास घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सेन आणि त्याचा खास साथीदार देबजानी मुखर्जी याची दक्षिण २४, परगणा जिल्ह्यातील जॉयनगर पोलिसांनी सखोल चौकशी केली. येथील काही गुंतवणूकदारांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रारी नोंदविलेल्या आहेत. विधाननगर पोलीस आयुक्तालयातील तपास अधिकारी शारदा समूहाच्या मालमत्तेबाबत सेन आणि मुखर्जीची कसून चौकशी करीत आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, लपविलेला पैसा व मालमत्ता हुडकून काढण्याचा आम्ही शर्तीने प्रयत्न करीत आहोत. यासोबतच रोख रकमांचे व्यवहार हाताळणार्या कंपनीच्या कर्मचार्यांना शोधण्याची गरज आहे. यात घोटाळ्यातील पैसा, संबंधित कागदपत्रे व दस्तऐवज हस्तगत करण्याचा आमचा हेतू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तपासादरम्यान सेनच्या मालकीच्या सिमला येथील ४0 एकर जमिनीचा शोध लागला, असे सूत्रांनी स्पष्ट केले. शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले कंपनीचे अनेक एजंट आणि गुंतवणूकदारांनी आत्महत्या केल्याने जनतेमध्ये कमालीचा रोष आहे.
सेनला अनावश्यक सवलती देणार्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका माजी अधिकार्याची तपास पथकाने चौकशी केली. सेनच्या चौकशीत त्याला मदत करणारे भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी), आयकर विभाग, बँका तसेच केंद्रीय व राज्य सरकारमधील अनेक अधिकार्यांची नावे चव्हाट्यावर आली आहेत. त्यांच्यापैकी काहींची आधीच चौकशी करण्यात आली. त्यांची उत्तरे आणि सेनने दिलेली माहिती सुसंगत आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे.
सुदिप्तो सेन याने ७.७ एकरात मोटारसायकलचा मोठा बनावट कारखाना आणि तेथे दीडशे कर्मचारी काम करीत असल्याचे भासवून हजारो गुंतवणूकदारांना विश्वास जिंकला. त्याने स्थापन केलेल्या शारदा समूहाने अल्पावधीतच हजारो गुंतवणूकदारांना मायाजालात ओढले. दुचाकी वाहनांच्या जोडणीचे काम सुरू आहे. सुटे भाग जोडले जात आहे हे दाखविताना हे कर्मचारी निळ्या गणवेशात दिसत असत.